Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

Mahakumbh Stampede Live Updates : प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात; आखाड्यांकडून अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय मागे

Mahakumbh Stampede : महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, पहाटे मोदींचा योगींना फोन 

Mahakumbh Stampede Live Updates : प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात; आखाड्यांकडून अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय मागे
LIVE Blog

Mahakumbh Stampede : संगमनगरी प्रयागराज इथं सध्या सुरुर असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या कोट्यवधी साधूसंत आणि सामान्य नागरिकांनी हजेरी लावलेली असताना इथं एक विपरित प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री उशिरानंतर इथं गर्दी वाढत गेली आणि बुधवारी भल्या पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अमृत स्नानासाठी गंगेच्या विविध घाटांवर जमण्यास सुरुवात केली आणि बॅरिकेट उघडताच इथं जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि भयंकर स्वरुपात चेंगराचेंगरी झाली. 

29 January 2025
29 January 2025 11:33 AM

महाकुंभ मेळ्यातून परतण्यासाठी रेल्वेकडून 360 विशेष ट्रेनची सोय 

महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाल्यामुळं चेंगराचेंगरीसारखी घटना घडली आणि इथं झालेली गर्दी लक्षात घेता भाविकांच्या प्रवासाची व्यवस्था लक्षात घेत रेल्वे प्रशासनानं पुढाकार घेतला आहे. इथून स्वस्थानी परतण्यासाठी भाविकांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वेनं तब्बल 360 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयागराजच्या रेल्वे स्थानकांतून या ट्रेन सुटतील. 

29 January 2025 10:29 AM

 

आखाड्यांकडून अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय मागे 

महाकुंभ मेळ्यात सकाळी 11 नंतर होणार आखाड्यांचं अमृत स्नान. आखाड्यांकडून अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय मागे. आखाड्यातील महंतांशी योगी आदित्यनाथ यांची चर्चा. अमृत स्नानादरम्यान शोभायात्रा काढण्यास मनाई. चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आखाड्यांचा निर्णय. 

29 January 2025 10:28 AM

प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात- योगी आदित्यनाथ 

"आज प्रयागराजमध्ये सुमारे 8-10 कोटी भाविक उपस्थित आहेत. संगम नाक्याच्या दिशेने भाविकांच्या हालचालीमुळे सतत दबाव आहे. आखाडा मार्गावरील बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करताना काही भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालये काल रात्रीपासून मौनी अमावस्येचा मुहूर्त साधत असल्याने मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. आत्तापर्यंत चार वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही प्रयागराजमधील परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु विविध आखाड्यांच्या संतांनी नम्रपणे सांगितले आहे प्रथम पवित्र स्नान करा आणि एकदा गर्दी कमी झाली की पवित्र स्नानासाठी आखाडे पुढे जातील, संगम नाक, नाग वासुकी मार्ग आणि मी भक्तांना आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, संपूर्ण कुंभ परिसरात भक्तांनी केवळ संगम नाकाकडे जाण्याची गरज नाही. भाविकांनी जवळच्या घाटांवर पवित्र स्नान करावे. आम्ही जखमींना योग्य वैद्यकीय उपचारांची खात्री देत ​​आहोत. भाविकांना त्यांच्या संबंधित स्थळी परत नेण्यासाठी रेल्वेने प्रयागराज भागातील वेगवेगळ्या स्थानकांवरून विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे."

 

29 January 2025 09:45 AM

गर्दी कमी होताच पवित्र अमृत स्नान करणार- रवींद्र पुरी 

29 January 2025 09:38 AM

महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत रेकॉर्डब्रेक भाविकांचं स्नान 

महाकुंभ मेळ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 20 कोटी भाविकांनी पवित्र गंगास्नान केल्याची आकडेवारी समोर आली आहे. इथं झालेली गर्दी पाहता आहा हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं यंत्रणांनी हवाई मार्गानं या भागावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

29 January 2025 09:35 AM

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीप्रकरणी योगी आदित्यनाथ करणार अधिकाऱ्यांची चौकशी... 

आधी उत्तरं द्या... महाकुंभ मेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेमध्ये लक्ष घालत उच्चस्तरीय बैठक बोलावली. सदर प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करत त्यांना या घटनेवरून प्रश्न विचारत सक्तीची कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

29 January 2025 09:06 AM

संगम घाटावर गर्दी कमी होईना, सध्या प्रयागराजमध्ये काय परिस्थिती? 

ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्यासाठी पहाटेच्या वेळी संगम घाटावर प्रचंड गर्दी. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गर्दी इतकी उसळली की पाहताक्षणी धडकी भरली. आरपीएफ, पोलीस दल आणि इतर यंत्रणांची घटनास्थळी उपस्थिती. गर्दी मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेईना. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन 

 

29 January 2025 08:46 AM

मुख्यमंत्री योगी यांची आखाड्यातील साधूंशी चर्चा 

मुख्यमंत्री योगी यांनी आखाड्यातील साधूंशी चर्चा केली. आखाडा परिषदेचे सरचिटणीस हरी गिरी यांच्याशी केलेली बातचीत. अमृत ​​स्नानासाठी संतांमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी म्हणाले. आखाड्यांमध्ये आंघोळीसाठी करार झाला. 1 वाजल्यानंतर आखाड्यातील साधू क्रमाने स्नानासाठी जातील. आखाड्यांच्या स्नानावेळी मिरवणूक काढली जाणार नाही. आखाड्यातील साधू-संत लष्कराशिवाय सामान्य पद्धतीने स्नान करतील. 

29 January 2025 08:36 AM

महाकुंभमधील दुर्घटनेनंतर निरंजनी आखाड्याचे प्रमुख कैलाशानंद गिरी महाराज म्हणतात... 

निरंजनी आखाड्याचे प्रमुख कैलाशानंद गिरी महाराज म्हणतात, "मोठी आणि अपरिहार्य गर्दी पाहून आखाडा परिषद आणि सर्व आचार्यांनी ठरवले आहे की आज आपण 'स्नान' करणार नाही. सर्वसामान्यांना होणाऱ्या समस्या लक्षात ठेवण्याची गरज आहे. भारतीय परंपरा, संत नेहमी सर्वांच्या हितासाठी प्रार्थना करतात आणि कार्य करतात. हे लक्षात घेऊन सर्व आखाड्यांनी सहमती दर्शवली आहे आणि ते घेण्याचे टाळले आहे. आज आपण वसंत पंचमीला पवित्र स्नान करू. 

 

29 January 2025 08:09 AM

'डेथ हुई है मम्मी की...'

'पोलिसांना बोलवूनही पोलीस तिथं समोर येत नव्हते. आम्ही तिथं येत होते तितक्यातच धक्काबुक्की झाली आणि आम्ही तिथेच पडलो. सगळी गर्दी आमच्यावर आली. मी कशीबशी वाचली पण माझी आई... माझ्या आईचा यामध्ये मृत्यू झाला' सांगत तरुणीनं या दुर्घटनेमध्ये आपल्या आईचा मृत्यू ओढावल्याचं भयावह वास्तव सर्वांसमोर आणलं. 

fallbacks

 

 

 

29 January 2025 08:00 AM

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया... 

29 January 2025 07:59 AM

महाकुंभ नियोजन पथकानं किला घाट रिकामा केला 

महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर इथं नियोजन मंडळानं किला घाट रिकामा केला असून, संगन नोज क्षेत्रातूनही नागरिकांना माघारी पाठवलं आहे. तर, अरेल घाटही निर्मनुष्य करण्यात आला असून इतर घाटांवर स्नान करण्याचं आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे. 

 

29 January 2025 07:57 AM

अमित शाह यांचा योगी आदित्यनाथांना फोन, पंतप्रधानांनीही दुसऱ्यांदा साधला संपर्क 

महाकुंभ मेळ्यात  झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनास्थळाचा आढावा घेतला. तर, पंतप्रधानांनीही योगींशी दुसऱ्यांदा साधला संपर्क. 

29 January 2025 07:36 AM

जिथे गंगा आहे तिथं पवित्र स्नान करा 

महाकुंभ मेळ्याच क्षमतेहून अधिक गर्दी झाल्यामुळं संगमावर येऊन पवित्र स्नान करण्याचा आग्रह सोडत जिथं गंगा आहे तिथं हे स्नान करावं असं आवाहन महाकुंभमेळ्यातील महंतांनी केलं आहे. 

 

29 January 2025 07:31 AM

यंदाच्या वर्षी फक्त 2 अमृत स्नान 

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आखाडा परिषदेनं मोठा निर्णय घेत यंदाच्या वर्षी फक्त दोन अमृत स्नानं असतील असं स्पष्ट केलं आहे. यापैकी पहिलं अमृत स्नान 14 जानेवारी रोजी पार पडलं असून, दुसरं अमृत स्नान 3 फेब्रुवारी रोजी वसंत पंतमीचा पार पडणार आहे. 

29 January 2025 07:28 AM

महाकुंभमध्ये क्षमतेहून अधिक गर्दी, अनेकजण बेपत्ता 

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी. 25 ते 30 भाविक जखमी.. काही भाविक बेपत्ता. मौनी अमावस्येनिमित्ताने स्नानादरम्यान दुर्घटना. सर्व आखाड्यांकडून पवित्र स्नान रद्द. प्रयागराजमध्ये क्षमतेहून अधिक भाविकांची गर्दी. संगमावर स्नान करण्याचा आग्रह करु नये. महंत रामभद्राचार्यांचं भाविकांना आवाहन. 

 

29 January 2025 07:17 AM

बचावकार्याला वेग 

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळताच इथं बचावपथकं आणि सुरक्षा यंत्रणांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनास्थळी 100 हून अधिक रुग्णवाहिका दाखल. 

 

29 January 2025 07:14 AM

महाकुंभमध्ये नेमकं काय घडलं? 

मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ मेळ्यामध्ये गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी म्हणून अनेकांनीच संगमाच्या दिशेनं धाव घेतली. यादरम्यान पोल क्रमांक 90 ते 118 मध्ये एकच गोंधळ माजला तिथं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. प्रथमदर्शींच्या माहितीनुसार बॅरिकेड उघडल्यानंतर एकाएकी लोकांचा लोंढा नियंत्रणाबाहेर गेला आणि इथं चेंगराचेंगरी झाली. 

 

29 January 2025 07:13 AM

पंतप्रधानांनी घेतला घटनेचा आढावा 

महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधत ताडीनं बचावकार्य आणि ; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द

 

Read More