Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

Operation Sindoor LIVE Updates: 'भारत काल रात्री पूर्णपणे तयारीने...', पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांची कबुली

Operation Sindoor India Air Strike in Pakistan LIVE News in Marathi: जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारतानं सडेतोड उत्तर दिलं. 

Operation Sindoor LIVE Updates: 'भारत काल रात्री पूर्णपणे तयारीने...', पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांची कबुली
LIVE Blog

Operation Sindoor India Air Strike in Pakistan LIVE News in Marathi: भारतीय सैन्यदलानं पहलगाम हल्ल्याचं सडोतोड उत्तर देण्यासाठी म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. रात्रीच्या अंधारात निर्धारित लक्ष्यभेद करत भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहिम फत्ते केली आणि या हल्ल्यानंतर सीमाभागातील तणावात आणखी वाढ झाली. ऑपरेशन सिंदूरनंतर देशात नेमक्या कोणत्या घडामोडींना वेग आला आहे, या हल्ल्याची आखणी नेमकी कशी झाली? पाहा सविस्तर बातम्या आणि सर्व अपडेट एका क्लिकवर. 

07 May 2025
07 May 2025 20:37 PM

Operation Sindoor : कसा केला पाकिस्तानचा खेळ  खल्लास?'ऑपरेशन सिंदूर'चे Video आर्मीकडून प्रसिद्ध

07 May 2025 19:26 PM

'भारत काल रात्री पूर्णपणे तयारीने...', पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांची कबुली

 पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्याच वेळी, भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानचे झालेले नुकसान मान्य करण्यात आले आहे. तो पुढे म्हणाला की काल रात्री आम्हाला प्रत्येक क्षणाचे अपडेट्स मिळत होते. काल रात्री भारत पूर्णपणे तयारीनिशी आला. भारताने पाकिस्तानमधील 6 ठिकाणांना लक्ष्य केले. पाकिस्तानी संसदेत भाषण करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललो आहोत, पहलगाम हल्ल्याची बातमी मिळाली तेव्हा मी स्वतः तुर्कीच्या दौऱ्यावर होतो. आम्ही तेव्हाच स्पष्ट केले होते की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असे सांगितले होते, परंतु भारताने आमची ऑफर स्वीकारली नाही.

07 May 2025 19:14 PM

 Operation Sindoor: सय्यद सलाहुद्दीन, हाफिज सईद, मसूद अझहर... कोणत्या दहशतवादी म्होरक्याचे हवाई हल्ल्यात किती नुकसान झाले?

07 May 2025 15:30 PM

'ऑपरेशन सिंदूर'नंतर बलुचिस्तानमध्ये सेलिब्रेशन

 

07 May 2025 15:29 PM

Operation Sindoor चे 5 विनाशकारी VIDEO; 9 दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक, पाकिस्तानच्या 7 पिढ्यांना लक्षात राहिल असा बदला

 

07 May 2025 14:27 PM

पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा जगासमोर; दहशतवाद्यांना 'शहीद' दर्जा

पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना शहिदांचा दर्जा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकंच नव्हे, तर पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलं. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. 

07 May 2025 14:25 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सतर्क, कोणत्या राज्यांवर विशेष लक्ष? 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सतर्क; पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमांनजीक असणाऱ्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा. 

 

07 May 2025 13:52 PM

उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक; ठाकरेंच्या शिवसेनेकडून...

उद्या दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  पहलगाम हल्यानंतर झालेल्या बैठकीला ठाकरे गटाच्या वतीने कोणीही हजर न राहिल्याने टीका झाली होती.

07 May 2025 13:22 PM

ऑपरेशन सिंदूरनंतर लेहमध्ये विमानसेवा बंद

लेहमध्ये विमानसेवा बंद. 10 मेपर्यंत विमानसेवा बंद. तिथं असणाऱ्या पर्यटकांना सध्या राहत असलेल्या हॉटेलमध्ये विनामूल्य राहता येणार. विमानसेवा बंद असल्यानं हॉटेल संघटनांचा मोठा निर्णय. 

07 May 2025 12:50 PM

बहावलपूरवरील हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या 10 कुटुंबीयांचा मृत्यू 

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अझहर याने निवेदन जारी करून म्हटलं आहे की भारताच्या बहावलपूरवरील हवाई हल्ल्यात त्याच्या 10 कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी अहवाल दिला आहे की त्याच्या घरात 14 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता बहावलपूर, पाकिस्तान इथं अंत्यविधी होणार असल्याचं त्यानं एका निवेदन पत्रकात म्हटलं.

07 May 2025 12:41 PM

एअर स्ट्राइक, मॉकड्रिल हे काही उत्तर नाही; 'ऑपरेशन सिंदूर'वरुन राज ठाकरेंचा सरकारवरच हल्लाबोल

07 May 2025 12:40 PM

Operation Sindoor नंतर वयाच्या 17 व्या वर्षी Indian Army जॉइन करणाऱ्या सोफिया कुरेशींची जगभरात का होतेय चर्चा?

07 May 2025 12:38 PM

मंत्रिमंडळ बैठकीत टाळ्या वाजवून ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधानांचं अभिनंदन

केंद्रीय केबिनेट बैठक संपली,  सगळे मंत्री PM च्या निवास स्थानावरून बाहेर निघाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदस्यांनी टाळ्या वाजवून ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. तिन्ही सैन्यदलांच्या शौर्यासाठी मंत्रिमंडळातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

07 May 2025 12:05 PM

'Operation Sindhoor' नंतर भारताचा चेहरा म्हणून जगासमोर आलेल्या विंग कमांडर व्योमिका सिंह आहेत तरी कोण?

>> क्लिककरुन वाचा सविस्तर बातमी

07 May 2025 11:00 AM

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिलं हल्ल्याचं ब्रिफिंग 

6 - 7 मे 2025 रात्री 1 वाजून 5 मिनिटांपासून 1.30 दरम्यान काय झालं याची माहिती देताना कर्नल कुरेशी म्हणाल्या, 'पहलगाम हल्ल्यात निष्पापांचा बळी गेल्यानं त्यांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच करण्यात आलं होतं. ज्याअंतर्गत पाकिस्तानातील 9 तळांवर लक्ष्य साधत ते नष्ट करण्यात आले. गेल्या दशकभरापासून पाकिस्तानात दशहतवादाला खतपाणी मिळत आहे. यामध्ये भरती, प्रशिक्षण केंद्र आणि लाँचपॅडचा समावेश होता. जो पाकिस्तान आणि पीओजेकेमध्ये पसरला आहे.' 

भारतीय सैन्यानं लक्ष्यांची निवड विश्वसनीय गोपनीय सूत्रांच्या माहितीआधारे करण्यात आली जेणेकरून दहशकतवादाचा कणा मोडता येईल अशी माहिती या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यांमध्ये यामध्ये निर्दोष नागरिक आणि सार्वजनिक ठिकाणांना नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

07 May 2025 10:45 AM

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच काही गोष्टी स्पष्ट केल्या

गतकाळात झालेल्या दहशवादी हल्लांचा उल्लेख आणि निषेध करत  पहलगाममध्ये झालेला हा हल्ला दंगली भडकवण्यासाठी झाल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र सचिवांनी दिली. पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी दहशतवादी हल्ला. टीआरएफनं घेतली हल्ल्याची जबाबदारी. हल्ल्यानंतर भारतानं स्वाभाविक रुपात पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर काही निर्णय घेण्यात आले. मात्र 22 एप्रिलच्या हल्ल्याच्या अपराध्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठीची मागणी वाढली. अतिशय मोजूनमापून आणि पूर्ण जबाबदारीनं ही कारवाई करण्यात आली. भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. भारताविरोधात पुढेही हल्ले होणार असून, ते थांबवणं आव्हानात्मक ठरणार आहे असाही सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला. 

07 May 2025 10:39 AM

सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे- अमित शाह 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघन आणि सततच्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफचे महासंचालक, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, असे गृहमंत्र्यांनी निर्देश दिले

07 May 2025 10:33 AM

भारतीय सैन्यदलानं पाकिस्तानवर हल्ला करताच संजय राऊत म्हणतात... 

'भारतीय सैन्यदल हे जगातील सर्वाधिक श्रेष्ठ आहे. पहलगावचा बदला घेतल्याने आमची छाती अभिमानाने फुलली आहे.याचे श्रेय भारतीय सैन्याला जाईल. हा फक्त एक ट्रेलर आहे. हल्ले झाले की नाहीत हे पुरावे मागण्याची गरज नाही. टार्गेट पूर्ण केले आहे. हा कुठला राजकीय विषय नाही.पंतप्रधान यांनी हल्ल्याची सर्व जबाबदारी भारतीय सैन्याकडे दिली होती. 26 भगिनींचे कुंकू पुसले गेले. या बहिणींचा बदला घेतला गेला.आपल्या परंपरेत सिंदूरला महत्व आहे' असं म्हणत त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली. 

07 May 2025 10:28 AM

माजी लष्कर प्रमुखांकडून सूचक ट्विट 

07 May 2025 10:26 AM

सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे- अमित शाह 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघन आणि सततच्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफचे महासंचालक, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, असे गृहमंत्र्यांनी निर्देश दिले

 

07 May 2025 10:24 AM

सैन्यदलातील महिला अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानवरील हल्ल्याचं  ब्रिफिंग 

Col सोफिया क्यूरेशी  आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली परराराष्ट्र सचिव विक्रम मिसरी पत्रकार परिषदेत हल्ल्याची माहिती देत आहेत. 

07 May 2025 10:22 AM

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानात शाळा बंद 

ऑपरेशन सिंदुर नंतर पाकिस्तान च्या इस्लामाबादमधील शाळा बंद करण्याचा निर्णय. भारताकडून आणखी हल्ला केला जाण्याची शक्यता लक्षात घेता शाळांना सुट्टी. पंजाब प्रांतातील शाळा बंद करण्याचा आधीच जाहीर केलाय निर्णय

 

07 May 2025 09:44 AM

'मोदी सरकार भारतावर...'; अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

"ऑपरेशन सिंदूर हे भारताने पहलगाममध्ये करण्यात आलेल्या हत्याकांडाला दिलेलं उत्तर आहे. आम्हाला आमच्या संरक्षण दलांचा अभिमान वाटतो," असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी म्हटलं आहे. तसेच, "मोदी सरकार भारतावर आणि भारतीयांवर झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. दहशतवादाला मूळासकट संपवण्यासाठी भारत कटीबद्ध आहे," असंही अमित शाह म्हणाले.

07 May 2025 09:32 AM

Operation Sindoor : 'मरकझ सुभान अल्लाह', याच त्या दहशतवाद्यांच्या छावणी; जीम, स्विमींग पूलसह सुरू होतं भयंकर ट्रेनिंग 

07 May 2025 08:58 AM

मुंबई विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याची धमकी

पाकिस्तानवर भारतीय लष्करानं हल्ला केल्यानंतर इथं मुंबई विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याची धमकी आली. सहार विमानतळ हॉटलच्या फोन लाइनवर धमकीचा कॉल. इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकीचा फोन आला. हे विमान चंदीगडहून मुंबईला येणार होते. रात्री उशिरा विमान मुंबई विमानतळावर उतरले. विमानात काहीही  संशयास्पद आढळले नसल्याची माहिती. 

07 May 2025 08:46 AM

हल्ल्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती... 

हा लष्कर आणि हवाई दलाचा संयुक्त ऑपरेशन असा संयुक्त हल्ला होता ज्यामध्ये 70% पेक्षा जास्त लक्ष्यांवर लष्कराने आणि सुमारे 30% लक्ष्यांवर हवाई दलाने हल्ला केला. भारतीय हवाई दलाने स्टँड-ऑफ शस्त्रे वापरली. लष्कराने इतर योग्य शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त ड्रोन आणि अचूक दारूगोळा वापरला. दोन्ही सेवांनी उत्कृष्टपणे समन्वयित आणि अंमलात आणलेलं असं हे संयुक्त ऑपरेशन होतं. 

07 May 2025 08:38 AM

"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" एका व्हिडीओतून इशारा देत भारतीय सैन्याकडून Operation Sindoor फत्ते

07 May 2025 08:00 AM

सीमाभागात दोन्ही सैन्यांकडून तोफगोळ्यांचा मारा... 

कुपवाडा आणि राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सैनिकांचे नुकसान झाले आहे. दोन्ही भागात जोरदार तोफगोळ्यांची देवाणघेवाण सुरू आहे. पाकिस्तानच्या अकारण गोळीबार आणि तोफगोळ्यांचा जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे.

07 May 2025 07:50 AM

पूंछमध्ये 6 नागरिकांचा मृत्यू.... 

पाकिस्तानातील नीलम व्हॅलीमध्ये भारतीय सैन्यानं हल्ला केल्यानंतर पाकिस्ताननंही शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. पूंछमध्ये पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. पूंछ जिल्ह्यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. 

 

07 May 2025 07:46 AM

भारतीय हवाई दलाने घेतला श्रीनगर विमानतळाचा ताबा 

ऑपरेशन सिंदूर: भारतीय हवाई दलाने श्रीनगर विमानतळाचा ताबा घेतला आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व नागरी उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत.

 

07 May 2025 07:45 AM

#ऑपरेशनसिंदूर | भारतीय सशस्त्र दलांनी लक्ष्य केलेल्या दहशतवाद्यांच्या केंद्रस्थानाबद्दल अधिक माहिती-

मरकझ सुभान अल्लाह, जैश-ए-मोहम्मद बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान- हे मरकझ जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून काम करते आणि 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यासह दहशतवादी योजनांशी संबंधित आहे. पुलवामा हल्ल्यातील गुन्हेगारांना या छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते: एएनआय 

07 May 2025 07:42 AM

'ऑपरेशन सिंदूर' नाव वाचून डोळ्यात पाणी आलं...' पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या पुणेकर प्रगती जगदाळे भावूक

>>  वाचा सविस्तर वृत्त

07 May 2025 07:33 AM

सिमला करार रद्द झाल्यानं LoC नाही; भारतीय सैन्याला कारवाईची मुभा 

प्राथमिक माहितीनुसार भारताने सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सिमला करार रद्द करण्याचं पाऊल उचललं. पाकिस्तानने सिमला करार रद्द केल्यामुळे आता एलओसी राहिली नाही. त्यामुळे भारतीय सैन्याला जहशतवादविरोधी कारवाईसाठी एका प्रकारे मुभा मिळाली आहे. 

 

07 May 2025 07:29 AM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण दलांच्या संपर्कात... 10 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद 

भारतीय लष्करातील तिन्ही दलांचे प्रमुख आणि लष्करप्रमुख 10 वाजता माध्यमांशी साधणार संवाद. ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुखांशी संवाद साधला. 

07 May 2025 07:25 AM

शुभम द्विवेदीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेल्या शुभम द्विवेदी या कानपूरच्या तरुणाच्या वडिलांनी पाकमधील या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. 'पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनी आपल्याला कैक जखमा दिल्या होत्या. आज सैन्यानं त्याचीही  परतफेड केली आहे. कुठे ना कुठे या जखमांवर आता फुंकर घालण्यात आली आहे', असं ते म्हणाले. 

 

07 May 2025 07:19 AM

गुप्तचर यंत्रणेकडून महत्त्वाची माहिती 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेच्या आधारे झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे चार, लष्कर-ए-तोयबाचे तीन आणि हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी गटांचे दोन लक्ष्य उद्ध्वस्त करण्यात आले.

 

07 May 2025 07:16 AM

ऑपरेशन सिंदूरअंतर्गत कोणकोणत्या तळांवर झाला हल्ला? 

भारतीय लष्करानं वायुसेनेच्या जॉईंट ऑपरेशनमध्ये पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांचा लक्ष्यभेद घेण्यात आला. 

1. बहावलपुर: जैशचं मुख्यालय

2. मुरीदके: लष्कर-ए-तोयबाचा तळ 

3. गुलपुर: या तळाचं थेट कनेक्शन पुंछ- राजौरी हल्ल्यासोबत

4. सवाई कँप (PoJK): सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन

5. बिलाल कँप: जैशचा लाँचपॅड

6. कोटली कँप: 50 दहशतवाद्यांना आसरा. लष्कराचा बॉम्ब हल्ल्याचा तळ

7. बर्नाला कँप: राजोरीपासून 10 किमी दूर.

8. सरजल कँप: IB नजीक, सांबा-कठुआ समोरत जैशचा तळ

9. महमूना कँप, हिजबुल मुजाहिद्दीनचा तळ 

07 May 2025 07:10 AM

भारतीय हवाई दल कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज 

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचा थरथराट. तिथं लाहोर आणि सियालकोट येथील विमानतळं पाकिस्ताननं बंद केलली असातनाच इथं भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं हवेत असल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने कोणत्याही आक्रमक कारवाया सुरू केल्यास भारतीय हवाई दल त्यास उत्तर देत ही कारवाई परतवून लावण्यासाठी सज्ज आहे.

 

07 May 2025 07:05 AM

बहावलपूरपासून मुस्तफाबादपर्यंत हादरला पाकिस्तान

बहावलपूरपासून मुस्तफाबादपर्यंत हादरला पाकिस्तान. लाहोर विमानतळ बंद. पाकिस्तानी एअरबेसमधून कोणत्याही विमानाचा प्रवास होणार नाही. पाकिस्तानाच आणिबाणीसारखी परिस्थिती...

 

07 May 2025 06:49 AM

'भारतीय सेना झिंदाबाद' 

जम्मू आणि काश्मीर: स्थानिकांनी 'भारतीय सेना झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्याने, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट केल्या जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि निर्देशित केले जात होते.

07 May 2025 06:46 AM
07 May 2025 06:45 AM

मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला 

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला. लष्कर-ए-तोयबाच्या मुरिदके येथील मुख्यालयावरही सर्जिकल स्ट्राइक. एकूण 9 ठिकाणी लक्ष्य करीत पाक आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त

 

07 May 2025 06:43 AM

आताच्या क्षणाची मोठी बातमी 

07 May 2025 06:20 AM

पाकिस्तानकडून तोफांचा मारा 

मंगळवारी रात्री पाकिस्तान सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रणरेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) पार करून मनमानी गोळीबार केला, ज्यामध्ये तोफांचा मारा (artillery shelling) देखील करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 

07 May 2025 06:08 AM

मध्यरात्री 1.20 मिनिटांपासून आताच्या क्षणापर्यंत नेमकं काय घडलं? महत्त्वाचे मुद्दे एका दृष्टीक्षेपात 

मध्यरात्री 1.20 वाजता - पाकिस्तानमधील आतंकंवादी तळांवर भारताकडून हल्ला

मध्यरात्री 1.50 वाजता - भारतीय सेनेनं घटनेची दिली माहिती

मध्यरात्री 2.46 वाजता - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं ट्विट

मध्यरात्री 3 वाजता - पाकिस्तानकडून एलओसी वर फायरींग

पहाटे 3.03 वाजता - पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याकडून घटनेची ट्विट करत पुष्टी

पहाटे 3.10 वाजता - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प यांच्याकडून घटनेवर प्रतिक्रीया

पहाटे 3.15 वाजता - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरीकीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्‍यांशी साधला संवाद

पहाटे 3.20 वाजता - पाकिस्तानकडून लाहौर, सियालकोट विमानतळ बंद करण्यात येत असल्याची घोषणा

पहाटे 4.54 वाजता - एअर इंडिया कडून काही भागात जाणारी विमान रद्द करण्याची घोषणा

07 May 2025 06:01 AM

भारतीय वायुदल सूत्रांकडून महत्त्वाची माहिती 

ऑपरेशनसिंदूरमध्ये सहभागी असलेल्या सर्व भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा शोध घेण्यात आला आहे. सर्व भारतीय हवाई दलाचे वैमानिक सुरक्षित आहेत. भारतीय सरकारी सूत्रांची माहिती 

 

07 May 2025 05:46 AM

एअर इंडियाने सूचना जाहीर

एअर इंडियाने प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 

07 May 2025 05:17 AM

जैशच्या मुख्यालयावर अचूक निशाणा; भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये मोठं यश

जैश-हाफिज सईदच्या अड्ड्यांवरही हल्ले करण्यात आले आहेत. तिन्ही सैन्य दलांनी भारतीय भूमीवरून क्षेपणास्त्रे सोडली आहेत. 
07 May 2025 05:00 AM

भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला

पाकिस्तानमधील हल्ल्यानंतर भारतीय हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. जे पाहता भारतीय सैन्यानं हा प्रयत्नही हाणून पाडत पाकच्या लढाऊ विमानाचा नष्ट केलं.

07 May 2025 04:53 AM
07 May 2025 04:53 AM

एअरस्ट्राईकमध्ये राफेल विमानांची मदत

भारतीय लष्कर आणि वायुदलानं एकत्रितरित्या केलेल्या या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानवर भारतानं राफेल विमानाच्या सहाय्यानं हॅमर बॉम्बनं केला मारा.

07 May 2025 04:42 AM

भारत- पाकिस्तान तणावात अमेरिकेची प्रतिक्रिया समोर

भारतीय लष्करानं लाँच केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेच्या प्रवक्त्यांकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आपल्याकडे सदर परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती नसून या संपूर्ण घटनाक्रमावर आपण लक्ष ठेवून असल्याचं मत अमेरिकेनं स्पष्ट केलं.

07 May 2025 04:36 AM

सीमाभागात तणावाचं वातावरण

भारतीय लष्करानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर सीमाभागात तणावाच्या परिस्थितीमध्ये आणखी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुंढ आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेनजीक भारतीय लष्कराच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

07 May 2025 04:28 AM

भारतातील सर्व संरक्षण दलांना सतर्कतेचा इशारा

पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यानंतर आता शेजारी राष्ट्राकडूनही भारतीय सीमाभागात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. या धर्तीवर भारतात सर्व सुरक्षा यंत्रणांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

07 May 2025 04:23 AM

पाकिस्तानला आणखी एक धक्का; भारताकडून F16 लढाऊ विमान उध्वस्त

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पराकोटीस पोहोचला असून, अखेर भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. या एअर स्ट्राईकनंतर भारतानं पाकिस्तानचं एफ 16 हे लढाऊ विमानही उध्वस्त केलं.

07 May 2025 04:20 AM

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हल्ल्यासंदर्भातील मोठी माहिती समोर

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतानं पाकिस्तानवर केंद्रीत कारवाई केली असून, या हल्ल्यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सामग्रीवर हल्ला केला नसून, भारतानं निवडक भागांना लक्ष्य करत हा हल्ला केला आहे.

07 May 2025 04:17 AM

श्रीनगर एअरपोर्टवर हाय अलर्ट

श्रीनगर एअरपोर्टवर हाय अलर्ट. पुढील सूचना येईपर्यंत विमानतळावरून कोणतंही विमान उड्डाण घेणार नाही अथवा लँडही करणार नाही. पाक सीमेनजीक असणाऱ्या भारतीय क्षेत्रात हाय अलर्ट जारी.

07 May 2025 04:08 AM

न्याय दिला आहे! हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची सूचक पोस्ट

पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानला धडा शिकवत पहलगाम हल्ल्यातील निष्पापांना न्याय दिल्याचं सूचित करणारी एक पोस्ट केली.

07 May 2025 04:06 AM

भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरअंतर्गत केला हल्ला

रात्रीच्या अंधारात पाकिस्तान हादरला; भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरअंतर्गत हा हल्ला केला. भारताच्या या स्ट्राईकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सध्या भारताच्या सीमाभागातही लष्कर तैनात ठेवण्यात आलं आहे.

07 May 2025 03:54 AM

भारतानं दिलं पहलगाम हल्ल्याचं उत्तर. पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त

Read More