Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

Ram Mandir Inauguration LIVE : 'राम आग नाही उर्जा, वाद नाही उपाय आहे'; प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणाले पंतप्रधान मोदी

Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतर आता तो क्षण नजीक आला असून, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे.   

Ram Mandir Inauguration LIVE : 'राम आग नाही उर्जा, वाद नाही उपाय आहे'; प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणाले पंतप्रधान मोदी
LIVE Blog

Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : प्रभू श्रीराम यांच्या नगरीमध्ये अर्थात अयोध्येमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण राममय झालं असून, तिथं कणाकणात रामाचा वावर जाणवत आहे. निमित्त आहे ते म्हणजे बहुप्रतिक्षित राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं. 

सोमवारी, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत (Ram lala Pran Pratishtha) पार पडणार आहे. अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे. अशा या सोहळ्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना? या सोहळ्यादरम्यान अयोध्येतील सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं मिळणार आहेत.  (Ram Mandir Inaugration) 

22 January 2024
22 January 2024 14:51 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : राम उपाय आहे, वाद नाही - पंतप्रधान मोदी

'प्रत्येक युगात लोकांनी राम जगला आहे. प्रत्येक युगात लोकांनी आपापल्या परीने राम त्यांच्या शब्दात व्यक्त केला आहे. हा रामरस जीवनाच्या प्रवाहासारखा अखंड वाहतो.  राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम उपाय आहे, वाद नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

22 January 2024 14:44 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : न्यायव्यवस्थेने न्यायाचा सन्मान राखला - पंतप्रधान मोदी 

आमच्या अनेक पिढ्या रामापासून विभक्त झाल्या आहेत. आपल्या संविधानाच्या पहिल्या प्रतिमध्येही राम आहे. न्यायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. न्यायाला समानार्थी असलेले प्रभू रामाचे मंदिरही न्याय्य पद्धतीने बांधले गेले. आज प्रत्येक गावात कीर्तन होत आहे. मंदिरांमध्ये उत्सव होत आहेत. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घरोघरी रामज्योती लावण्याची तयारी सुरू आहे.

22 January 2024 14:41 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : आज आमचा राम आला आहे - पंतप्रधान मोदी 

'आमचा रामलला आता तंबूत राहणार नाही. आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. आज आमचा राम आला आहे. आज आपल्याला श्री रामाचे मंदिर सापडले आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून राष्ट्र उभे राहिले आहे. ही वेळ सामान्य नाही. प्रदीर्घ वियोगामुळे आलेला त्रास आता संपला आहे. प्रदीर्घ वियोगामुळे आलेला त्रास आता संपला आहे. राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून कायदेशीर लढाई लढली गेली,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

22 January 2024 14:22 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : मी या क्षणी दैवी अनुभव घेतोय- पंतप्रधान मोदी 

'ज्या महान हस्तींमुळं हे दीव्य कार्य घडलं, त्यांचा सहवास मला जाणवतोय. मी प्रभू श्रीराम यांच्यापुढं नसमस्तक होतो. त्यांच्यापुढं क्षमायाचनाही करत आहे. पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येमध्ये राहिलेल्या काही त्रुटी राहिल्या असतील, कारण इतक्या पिढ्यांपर्यंत हे काम करता आलं नाही, पण आज मात्र ती उणीवही भरून निघाली आहे. मला विश्वास आहे की श्रीराम आपल्याला नक्कीच क्षमा करतील', असं म्हणत आपल्या दैवी अनुभवांचं कथन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 

22 January 2024 14:16 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : अखेर तो क्षण आला... म्हणताना पंतप्रधान भावूक 

गर्भगृहातील अनुभवाचं कथन करत असताना मोठ्या जनसमुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. माझं शरीर अजूनही स्पंदीत असून, चित्त प्राणप्रतिष्ठेच्याच क्षणात लीन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता रामलल्ला तंबूत राहणार नाहीत, असं म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला होता. 

22 January 2024 13:46 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 11 दिवसांचं अनुष्ठान सफल संपूर्ण 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या कारणास्तव 11 दिवसांचं अनुष्ठान ठेवलं आणि अखेर त्यांचा हा संकल्प सिद्धीस गेल्यानंतर रामाच्याच भूमीत त्यांनी हे अनुष्ठान महंतांच्या हस्ते जल ग्रहण करत पूर्णत्वास नेलं. 

fallbacks

22 January 2024 13:20 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : माता कौशल्येनं दिलेलं खास नाव... 

माता कौशल्येनं रामलल्लाला दिलेल्या राघव या नावासह पाच वर्षांच्या बालरुपात रामलल्ला अयोध्येतील आपल्या जन्म भूमीत उभारण्यात आलेल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

22 January 2024 13:10 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : मंगल भवन अमंगल हारी... 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रामलल्लांना साष्टांग दंडवत; प्राणप्रतिष्ठेनंतरच्या विधींदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रामाच्या सुरेख मूर्तीपुढं साष्टांग दंडवत घातला. 

fallbacks

22 January 2024 13:04 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : श्री राम चंद्र कृपालु भजमन... 

श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्। नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्। अशा रामस्तुतीच्या स्वरांनी फक्त अयोध्याच नव्हे देशही दुमदुमला... 

22 January 2024 12:59 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलल्लाची पहिली आरती..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची पहिली आरती संपन्न झाली. यावेळी मंदिर परिसरात एकच उत्साह पाहायला मिळाला. 

22 January 2024 12:44 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रघुपती राघव राजाराम... 

रघुपती राघव राजाराम.. च्या भजनानं अयोध्येतील वातावरण अतिशय मंगलमय झालं असून, मंदिरात श्रीरामचरणी पंतप्रधान मोदी श्रद्धासुमनं अर्पण करताना दिसत आहेत. 

22 January 2024 12:35 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : शंखनाद आणि घंटानादानं अयोध्या दुमदुमली 

पायो जी मैनै राम रतन धन पायो... अशा मंगल स्वरांच्या माध्यमातून रामलल्लांची पहिली झलक संपूर्ण जगानं पाहिली. सनई चौघडे आणि शंखानादानं अयोध्येत रामनामाचा गजर केला आणि रोमहर्षक वातावरणानं सारेच भारावले. 

22 January 2024 12:22 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : परम योग... 

इंद्र, आनंद, सर्वार्थ सिद्धी अशा पंचबान न झाल्यामुळं एक अदभूत योग तयार झाला असून, त्याच मुहूर्तावर राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्राणप्रतिष्ठा विधीसाठी राम मंदिरातील गर्भगृहात सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान मोदी, आनंदीबेन पटेल, योदी आदित्यनाथ यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. 

22 January 2024 12:19 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : तपस्वी... 

गेल्या 11 दिवसांपासून एका योगी, तपस्वीप्रमाणं पंतप्रधान मोदी यांनी ध्यानधारणा केली असून, आज ते रामलल्लांपुढं नतमस्तक होताना दिसत आहेत. 

22 January 2024 12:10 PM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात दाखल झाले असून, यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर असणारी प्रफुल्लित मुद्रा पाहण्याजोगी होती. 

22 January 2024 11:48 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान होताच मूर्तीकार म्हणतात... 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर परिसरात दाखल झालेल्या योगीराज यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, 'सध्या मला मी स्वत: या विश्वातील सर्वात नशिबवान व्यक्ती असल्यासारखं वाटत आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या पूर्वजांचा, माझ्या कुटुंबीयांचा आशीर्वाद मिळाला आहे. रामलल्लांची मूर्ती साकारल्याचं वास्तव पाहतो तेव्हा मला मी स्वप्ननगरीतच असल्याचा भास होतो.'

हेसुद्धा वाचा : Ram Mandir Inauguration : 'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video 

22 January 2024 11:37 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : थेट प्रक्षेपणावर बंदी घालता येणार नाही 

फक्त इतर समुदायाचे लोक एखाद्या परिसरात राहतात म्हणून तिथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यावर निर्बंध घालता येणार नाहीत असे थेट आदेश सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकारला दिले आहेत.  राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. 

22 January 2024 11:31 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : सुरेल नजराणा 

गायक सोनू निगम यानं अयोध्येतील भक्तिमय वातावरणाशी एकरुप होत सादर केलं गीत... 

22 January 2024 11:20 AM

22 January 2024 11:13 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : सरसंघचालक अयोध्येत 

सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी उपस्थितांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. साऊथ सुपरस्टार रजनीकांतही अयोध्येत दाखल झाले. रजनीकांत यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. रजनीकांत प्रवेशद्वारापाशी येताच त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी काहीशी गर्दी झाली. 

 

22 January 2024 10:53 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : महानायक अयोध्येत... 

हिंदी कलाजगतातील महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी उपस्थितांची भेट घेत त्यांना अभिवादन केलं. 

22 January 2024 10:40 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : हा ऐतिहासिक क्षण.... 

हिंदू धर्माला अनुसरून मी असं अदभूत वातावरण आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. हा क्षण दिवाळीहूनही मोठा असून, हीच खरी दिवाळी आहे अशी प्रतिक्रिया अयोध्येत दाखल झालेल्या ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिली. 
अभिनेत्री कंगना रणौत, अभिनेता विवेक ओबेरॉय यांनीही या सोहळ्यासाठी अयोध्येत हजेरी लावली आहे. 

22 January 2024 09:52 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : प्राणप्रतिष्ठेच्या वेळी गर्भगृहात कोणाची उपस्थिती? 

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावेळी गर्भगृहात कोण कोण असतील?

नरेंद्र मोदी, पंतप्रधान
योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
आनंदीबेन पटेल, राज्यपाल, उत्तर प्रदेश
मोहन भागवत, सरसंघचालक
आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी

22 January 2024 09:36 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : कडेकोट बंदोबस्त 

अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरु असताना दुसरीकडे शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येत जवळपास 15 हजार पोलीस आणि सुरक्षाबल तैनात करण्यात आले आहेत.. तर लता मंगेशकर चौकात रॅपिड अॅक्शन फोर्स सज्ज ठेवण्यात आलंय.. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत सुरक्षा कठोर करण्यात आली आहे.

22 January 2024 08:51 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाची अनुपस्थिती?

राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती असतानाच काही महत्त्वाची नावं मात्र या सोहळ्यासाठी अनुपस्थित असणार आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ट अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार अमित शाह 25  जानेवारी रोजी अयोध्येला भेट देतील. तर, राष्ट्रपती मुर्मू 28 जानेवारी रोजी अयोध्येला भेट देतील. 

हेसुद्धा वाचा : रामलल्लासाठी नाशिकमधून खास पुष्पहार, विविध देशांची कला वापरुन 'या' तरुणींनी तयार केली खास माळ

 

22 January 2024 08:40 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : डमरू वादन 

अयोध्येतील हनुमान गढी परिसरामध्ये वाराणासीहून आलेल्या एका पथकाकडून विशेष डमरू वादन करण्यात आलं आहे. श्रीराम जन्मभूमीमध्ये काशी विश्वनाथ धाम येथून विशेष निमंत्रणासह या कलाकारंना अयोध्येत बोलवण्यात आलं आहे. पाच किलोंच्या एका डमरूचं वादन इथं सादर करण्यात आलं. 

fallbacks

22 January 2024 08:15 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : शरयू तिरावर कसं आहे दृश्य? 

राम मंदिर उदघाटन सोहळा आणि रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या धर्तीवर सध्या अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. तर, शरयू नदीच्या काठावर जय श्री राम असं लिहिलेले अनेक ध्वज पाहताना मंगलमय वातावरणाची अनुभूती होत आहे. 

22 January 2024 07:55 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : सेलिब्रिटी निघाले अयोध्येला... 

अमिताभ बच्चन, राम चरण, विकी कौशल- कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आयुष्मान खुराणा या सेलिब्रिटींनी अयोध्येची वाट धरली असून, ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी ही मंडळी निघाली आहेत. 

हेसुद्धा वाचा : Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

22 January 2024 07:13 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : लोककलावंतांचा जल्लोष 

राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं अयोध्येमध्ये सध्या अनेक लोककला सादर करण्यात येत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं इथं अनेक कलाकारांनी आपल्या लोककलांचं प्रदर्शन केलं. 

22 January 2024 07:09 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : 114 कलशांनी श्रीरामाला अभिषेक, रात्रिजागरण अन्..

अयोध्येतील राम मंदिराजवळच्या यज्ञशालेमध्ये प्राणप्रतिष्ठापणेच्या आदल्या दिवशीचे म्हणजेच 21 जानेवारी रोजीचे श्री राम जन्मभूमि तीर्थ श्रेत्रच्या खात्यावरुन शेअर करण्यात आले आहेत. श्री रामलला सरकार प्राण प्रतिष्ठा अनुष्ठानमध्ये आज स्थापित देवतांचे दैनिक पूजन हवन, पारायण इत्यादी कार्य, प्रातः मध्वाधिनास, मूर्ति ला 114 कलशांमधील विविध औषधीयुक्त पाण्याने केलेला अभिषेक घालण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : रामल्ल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येचे अयोध्येतील Photos

22 January 2024 07:03 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : कसा असेल प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि कार्यक्रम? 

सोमवारी पहाटेपासून राम मंदिरात मंगलध्वनी निनादण्यास सुरुवाच होणार आहे. किंबहुना ही सुरुवात झाली असून, विविध राज्यांमधील मंगल वाद्यांचा त्यासाठी वापर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होणार असून, मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी दूर केल्यानंतर रामलल्ला आरशामध्ये स्वत:चं रुप न्याहाळतील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान आचार्यांच्या हस्ते पूजाविधी संपन्न होईल. यावेळी गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत इतर 5 जणांची उपस्थिती असेल. अभिजीत मुहूर्तामध्ये राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. 

22 January 2024 06:55 AM

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : मंदिराला फुलांची सुंदर सजावट

राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं अयोध्येतील मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी तब्बल 2 हजार 500 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला असून, दिल्ली कोलकाता इथूनच नव्हेतर थेट थायलंड आणि अर्जेंटिनामधूनही मंदिरासाठी फुलं आणली आहेत.  गुजरातमधील माळी समाजानंही मंदिरासाठी 300 क्विंटल फुलं भेट दिली आहेत. 

हेसुद्धा पाहा : रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या मंदिरात 250000 किलो फुलांनी सजावट; हे Photos पाहाच

 

Read More