Union Budget 2024 Live Updates in Marathi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर करणार असून, हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी सादर केला जाणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल आणि सत्तास्थापना पार पडल्यानंतर सविस्तर अर्थसंकल्प देशातील सरकारकडून सादर केला जाईल.
दरम्यान, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच सविस्कर अर्थसंकल्प सादर केला जाईल असं म्हणताना पुन्हा एकदा मोदी सरकार असेच संकेत दिल्याचं पाहायला मिळालं. तूर्तास यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण मतदार, पगारदार आणि एकंदर सर्व घटकांना अंदाजात घेत अर्थसंकल्पात कोणत्या विशेष तरतुदी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
करदात्यांचे आभार मानत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करास पात्र नसेल असं स्पष्ट केलं. थोडक्यात यंदा जुनीच करप्रणाली लागू राहणार असून, आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Interim Budget | "I propose to retain the same tax rates for direct and indirect taxes including import duties," says FM.#Budget2024 pic.twitter.com/EseKRQblWQ
— ANI (@ANI) February 1, 2024
यंदाच्या अर्थसंकल्पामधून बायोफ्यूल अर्थात जैविक इंधनासाठीच्या योजनांची तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-वाहन, रेल्वे समुद्र मार्ग जोडण्यासाठीचे प्रकल्प यावर सरकार भर देईल. पर्यटनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीही सरकार काम करेल. टीयर 2 आणि टीयर 3 शहरांना हवाई मार्गानं जोडण्यात येणार आहे. वंदे भारतसाठी 40 लाख डब्यांची निर्मिती करणार. मेट्रो, नमो गाड्यांचं जाळं उभारणार
2024- 25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण उत्पन्नाचा आकडा 30.80 लाख कोटी रुपये आणि राहू शकतो.
देशातील गरीब आणि गरजवंतांच्या कुटुंबांना 18.50 रुपये प्रति किलो इतक्या दरानं 31 मार्चपर्यंत साखर उपलब्ध करून देणार.
तंत्रज्ञानाच्या दिशेनं झुलकलेल्या सध्याच्या तरुणाईचा उल्लेख करत हा त्यांच्यासाठी सुवर्णकाळ असणार आहे, असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी 50 वर्षांच्या व्याजदरमुक्त कर्ज देण्याची हमी देत 1 लाख रुपयांच्या कॉर्पसला अधोरेखित केलं.
For the youth, FM Sitharaman says, "For our tech-savvy youth, this will be a golden era. A corpus of Rs 1 lakh crore will be established with 50-year interest-free loan provided. It will be for long-term financing or re-financing with low or nil interest rates." pic.twitter.com/Yw9o7B3yoU
— ANI (@ANI) February 1, 2024
देशभरात लखपती दीदी या उपक्रमाला दुजोरा देण्यात येत असून, यामुळं साधारण 9 कोटी महिलांच्या जीवनात बदल झाला आहे, त्यामुळं त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. केंद्राच्या वतीनं अंगणवाडी उपक्रमांनाही वेग आला असून, 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत.
सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी देशात प्रयत्न सुरु होणार असून, त्याअंतर्गत लसीकरणही पार पडणार आहे. यावेळी त्यांनी देशातील दुग्धउत्पादनावर भर दिला. तर, दर महिन्याला 300 यूनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली.
आत्मनिर्भर तेलबियांचं उत्पादन सुरु करणार. तिळ, सोयाबिन, सूर्यफूलाच्या उत्पादनावर भर देणार.
ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष राहील असं सांगत असताना सरकारकडून मध्यमवर्गीयांसाठी गृह योजना तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. चाळी, झोपडपट्टी किंवा बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये जे नागरिक राहतात त्यांना घर खरेदी किंवा उभारणीसाठी सरकार सढळ हस्ते मदत करणार आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरं बांधण्यात आली आहेत. आता सरकार मध्यम वर्गातील लोकांसाठी घरांची योजना आणणार आहे. यामध्ये येत्या 5 वर्षांत तब्बल 2 कोटी घरं दिली जाणार आहेत.
FM Sitharaman says, "The government is equally focused on GDP - Governance, Development and Performance." pic.twitter.com/iynkhPCxT5
— ANI (@ANI) February 1, 2024
कोरोना संकटानं चहुबाजूंनी विळखा घातला असताना भारतानं मात्र यातून यशस्वीपणे वाट काढली. देशातील पायाभूत सुविधांमध्ये काही अमूलाग्र बदल करण्यात आले. पुढची पाच वर्ष ही उज्वल भवितव्याची आणि भारताच्या सुवर्णमयी भविष्याची असणाप आहेत. 'सबका प्रयास' च्या माध्यमातून यावेळी अर्थमंत्र्यांनी प्रत्येक भारतीयाचं योगदान अधोरेखित केलं. देशात सध्या अधिकाधिक संधी निर्माण होत असल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भारतामध्ये 70 टक्के महिलांना त्यांच्या घराची संपूर्ण किंवा जोड मालकी देत महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करण्यात आलं. आमचं सरकार हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काम करत असल्याचा मुद्दा अर्थमंत्र्यांनी पुन्हा अधोरेखित केला. नागरिक चांगली जीवनशैली जगत असून, त्यांचा अर्थार्जनाचा स्तरही उंचावला आहे. सध्या नागरिकांना त्यांची ध्येय्य गाठता येत आहेत. तरुणांना सशक्त करण्याचाच या सरकारचा प्रयत्न आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भारतामध्ये 70 टक्के महिलांना त्यांच्या घराची संपूर्ण किंवा जोड मालकी देत महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करण्यात आलं. आमचं सरकार हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काम करत असल्याचा मुद्दा अर्थमंत्र्यांनी पुन्हा अधोरेखित केला. नागरिक चांगली जीवनशैली जगत असून, त्यांचा अर्थार्जनाचा स्तरही उंचावला आहे. सध्या नागरिकांना त्यांची ध्येय्य गाठता येत आहेत. तरुणांना सशक्त करण्याचाच या सरकारचा प्रयत्न आहे.
78 लाख फेरीवाल्यांना थेट मदत केल्याचं सांगत गरिबाचं कल्याण म्हणजे देशाच कल्याण हा मुद्दा अर्थमंत्र्यांन अर्थसंकल्प सादर करताना मांडला. यावेळी दीड कोटी शेतकऱ्यांना पीएम विमा योजनेचा फायदा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सर्वांगीण आणि सर्वसामावेशक बजेट तयार करण्यात आलं आहे. कोरोना काळानंतर अर्थव्यवस्थेत आम्ही अमुलाग्र बदल केला आहे. 80 कोटी लोकांना मोफत राशन दिल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. गरिबींच्या खात्यात जनधनच्या माध्यमातून 34 लाख कोटी रुपये जमा करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता या चौघांच्या विकासावर लक्ष ठेवण्याची गरज. त्यांचा विकास हा आमची सर्वात मोठं प्राधान्य क्रमाला असणार आहे. त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास असं समिकरण आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्या.
"We need to focus on - Garib, Mahilayen, Yuva and Annadata; Their needs and aspirations are our highest priorities," says Finance Minister Nirmala Sitharaman in her interim Budget speech. pic.twitter.com/6HoDXsdx2R
— ANI (@ANI) February 1, 2024
सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प... अर्थमंत्र्यांची ग्वाही. समाजिक न्याय ही अनेकांसाठी राजकीय घोषणा होती, पण आमच्यासाठी हा कामाचा मूळ भाग आणि हेतू आहे, असं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
Union Minister Nirmala Sitharaman presents the Union Interim Budget 2024-25 at the Parliament. pic.twitter.com/ooIT0ztsof
— ANI (@ANI) February 1, 2024
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारतही मोठ्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला सेंसेक्स 120 अंकांनी वर असून, Paytm ला मात्र 20% चं लोअर सर्किट लागलं आहे.
मागील वर्षी अर्थात 2023 च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. या एकवेळ बचत योजनेत महिलांना 7.5 टक्के व्याज दिलं जातंय. यंदाही अर्थसंकल्पाकडून महिलांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा असू शकतात, असं मानलं जात आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थ मंत्रालयाबाहेर त्यांच्या टीमसोबत उभं राहत देशाता अर्थसंकल्प माध्यमांपुढे आणला आणि अतिशय प्रसन्न मुद्रेनं त्या पुढे निघाल्या.
#WATCH | Finance Minister Nirmala Sitharaman along with her team before the presentation of the country's interim Budget pic.twitter.com/hohpB7qtZi
— ANI (@ANI) February 1, 2024
सकाळी साधारण 8.15 मिनिटांनी स्वत:च्या घरातून निघाल्यानंत अर्थमंत्री निर्मला सीतारमण 8.50 मिनिटांपर्यंत त्यांच्या टीमसोबत चर्चा करतील. ज्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक 2 वर संपूर्ण आढावा घेतला जाईल. पुढे इथूनच त्या राष्ट्रपती भवनात आणि त्यानंतर संसद भवनात पोहोचतील.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कारण, गॅस दर पुन्हा वाढले आहेत. अर्थात हे घरगुती वापरातील गॅस सिलेंडर नसून, व्यावसायिक गॅसच्या दरात ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस 14 रुपयांनी महागला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. परिणामी आता हॉटेलमधील खाणं महागण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पाच वर्ष सलग देशाचा आर्थिक गाडा हाकरणाऱ्या सीतारमण या पहिल्या महिला बनतायत. सीतारमण यांनी आतापर्यंत पाच पूर्ण आणि आजचा अंतरिम अर्थसंकल्प असे एकूण ६ अर्थसंकल्प सादर केलेत. सलग सहा वेळा अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम मोरारजी देसाईंच्या नावे आहे. जुलै 2019 पासून सीतारमण यांनी पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. आजच्या भाषणानंतर निर्मला सीतारमण मनमोहन सिंह, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या सर्वांना मागे टाकतील. या मंत्र्यांनी प्रत्येकी पाच अर्थसंकल्पीय भाषणं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळाल्यावर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रालयाची सूत्र सोपवली. तेव्हापासून आज तागायत सीतारमण यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे असं म्हणायला हरकत नाही.
अर्थसंकल्प जरी अंतरिम असला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातून अनेक अपेक्षा आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात अर्थसंकल्पातून काय काय घोषणा होऊ शकतात?१ किसान सन्मान निधीमध्ये २००० रुपयांची वाढीची घोषणा होऊ शकते
विकासदराचे आकडे साडे सात टक्क्याच्या दिशेने घोडदौड करत असले तरी हा विकास सरकारी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या खर्चामुळे होतोय असं चित्र आहे. प्रत्यक्ष नागरिकांनी केलेल्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेत जी मजबूती येते ती अद्यापही फारशी दिसत नाही.त्यावर सीतारमण यांच्या भाषणातून उत्तर मिळतंय का याकडे अर्थविश्वाचं लक्ष असणार आहे.
नव्या संसदभवनातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. २०२४ सार्वत्रिक निवडणूक जेमतेम महिन्याभरावर येऊन ठेपलेली असताना आजच्या भाषणातून अर्थमंत्री सीतारमण नागरिकांवर कोणतीही नवी ओझी टाकणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. पण त्यासोबतच कोरोनानंतर सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात वेगवान विकासदराची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतील नागरिकांना अर्थमंत्री या विकासाचा फायदा प्रत्यक्ष लोकांपर्यंत मिळतोय का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Budget 2024 LIVE Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर करणार आहेत. त्या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, यावेळी अर्थसंकल्पावर सर्वांच्याच नजरा असणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.