Marathi News> भारत
Advertisement

प्लॅटफॉर्मवर घुसली भरधाव लोकल, पाहा श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ

या लोकलचा अपघात पाहून तुम्हाला मुंबईतल्या लोकल अपघाताची आठवण होईल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ 

प्लॅटफॉर्मवर घुसली भरधाव लोकल, पाहा श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ

मुंबई : काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. या घटनेनं मुंबईतील लोकल ट्रेनच्या दुर्घटनेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. भरधाव लोकल ट्रेन रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेची भीषणता दाखवणारे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

काही वर्षांपूर्वी असाच प्रकार मुंबईतही घडला होता. आता पुन्हा एकदा रुळ सोडून लोकल प्लॅटफॉर्मवर घुसल्याने खळबळ उडाली. यावेळी प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण अपघातात पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

कुठे घडली घटना? 
तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात लोकलचं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

या भीषण अपघातात प्लॅटफॉर्म शेल्टरचं नुकसान झालं. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. ब्रेक फेल झाल्याने हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चौकशीनंतर सविस्तर माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

Read More