नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यामध्येही भाजप-शिवसेनेची कामगिरी दमदार झाली आहे. देशभरात भाजपने बहुमत गाठलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
'सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत' असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. आपण एकत्र वाढू, एकत्रचं आपली भरभराट होईल. आपण सगळे मिळून मजबूत आणि सर्वसमावेशक भारत बनवू. भारताचा पुन्हा एकदा विजय झाला आहे, असं ट्विट मोदींनी केलं.
सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) May 23, 2019
Together we grow.
Together we prosper.
Together we will build a strong and inclusive India.
India wins yet again! #VijayiBharat
२६ मेरोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. २६ मेरोजीच भाजपने संसदीय दलाची बैठक बोलावली आहे. याच दिवशी भाजप त्यांचा संसदीय दलाचा नेता निवडला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१४ सालीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ मेरोजीच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. २०१४ सालच्या मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला सार्क देशांचे प्रमुख उपस्थित राहिले होते. यामध्ये पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला कोणाला बोलावतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.