Marathi News> भारत
Advertisement

'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान मोठा घोटाळा'; राहुल गांधींनी थेट पुरावे देत मांडले 5 महत्त्वाचे मुद्दे

Rahul Gandhi On Voter Fraud: निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेस सतत प्रश्न उपस्थित करत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार यादीवर आणि निवडणुकांच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करुन राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. 

'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान मोठा घोटाळा'; राहुल गांधींनी थेट पुरावे देत मांडले 5 महत्त्वाचे मुद्दे

Rahul Gandhi On Voter Fraud: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार यांनी गुरुवारी पुन्हा एकदा निवडणुक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान घोटाळ्या झाल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकादरम्यान बोगस मतदान झाल्ं असून हे मतदार आले कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त हरियाणातदेखील मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत हे मुद्दे उपस्थित केले असून त्यांनी पाच मुद्द्यांवर सवाल उपस्थित केले आहेत. 

नवी दिल्लीतील AICC मुख्यालयात राहुल गांधी यांनी कॉम्युटर प्रेझेंन्टेशन जारी करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी 5 मुद्दे उपस्थित केलेत. राहुल गांधी यांनी स्क्रीनवर महाराष्ट्र आणि कर्नाटची वोटर लिस्ट दाखवत म्हटलं की, एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या मतदान केंद्रावरील यादीत आहे. यादीत अनेक ठिकाणी लोकांचे फोटो नाहीयेत. तर काही ठिकाणी खोटे पत्ते देण्यात आले आहेत. 

'मतदान चोरीचा आरोप'

राहुल गांधी यांच्या आरोपानुसार, महाराष्ट्र निवडणुकांच्या शेवटच्या पाच महिन्यात अनेक मतदार जोडले गेले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बोगद मतदान झाले. या दरम्यान 40 लाख बोगस मतदान झाले. 

'एकाच पत्त्यावर 46 मतदार'

संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानक मतदानाची संख्या वाढली. पोलिंग आणि ओपिनियम पोलमध्ये डाटा वेगळा दिसतोय मात्र निकाल वेगळाच आहे. वोटर लिस्टमध्ये एका पत्त्यावर 46 मतदार सापडले. 

'एक लाखांहून अधिक मतांची चोरी'

मतदार यादीत बोगस नावं जोडण्यात आली आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यांनी कर्नाटकची मतदार यादी दाखवत दावा केला की, बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात मतांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली झाली. महादेवपुरा क्षेत्रात 6.5 लाख मतांमध्ये एक लाखाहून अधिक मतांची चोरी झाली आहे. 

'एका व्यक्तीची चार मतदार कार्ड'

एका व्यक्तीने चार वेगवेगळ्या ठिकाणाचे मतदार कार्ड बनवण्यात आले. एकच मतदार तीन राज्य कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये रजिस्टर करण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

'एक कोटी नवीन मतदार'

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान एक कोटी नवीन मतदार कुठून आले. हा मुद्दा इंडिया आघाडीने निवडणुक आयोगाकडे उपस्थित केला होता. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.  

Read More