Marathi News> भारत
Advertisement

Indigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल

विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.   

 Indigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल

Lord Ganesh Viral Image: देशभरात लाडक्या बाप्पाच्या अगदी धुमधडाक्यात आगमन झाले आहे. अशातच बाप्पाचा एक अतिशय गोड सुंदर फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये बाप्पा विमानात विंडो सीटला बसला आहे. मोदक खात बाप्पा विमानातून प्रवास करत आहे. हा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

इंडिगो एअरलाईन्सने शेअर केला फोटो

इंडिगो एअरलाईन्सनेने हा बाप्पाचा क्यूट फोटो शेअर केला आहे. इंडिगो एअरलाईन्सने AI च्या मदतीने हा फोटो तयार केला आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या twitter, instagram तसेच सर्व सोशल मिडिया आकाऊंट्सवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटो तुफाना व्हायरल होत आहे. 

फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

विमानात विंडो सिटला बसून मोदक खाणाऱ्या या बाप्पाच्या  फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हजारो लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. हजारो लोकांनी या फोटोवर कमेंट् केल्या आहेत. कर, ट्विटरवर 100 पेक्षा अधिकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. खूप लोकांनी हा फोटो सेव्ह करुन तो स्टेटसला देखील ठेवला आहे. 

काय खास आहे या फोटोत 

बाप्पाचा हा फोटो खूपच गोड आहे. या फोटोत दिसणाऱ्या बाप्पाचे डोळे अतिशय बोलके आहेत. स्मित हास्य बाप्पाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. बाप्पाच्या हातात एक मोठा ट्रे आहे. यात भरपूर मोदक आणि लाडू आहेत. बाप्पा मोदक खात खात मस्त मजेत विमानातून सफर करत आहे. बाप्पाचे हे लोभस रुप मनाला भावत आहे. 

विमानाने गणपती बाप्पाचे आगमन

इंडिगो एअरलाईन्सने AI च्या मदतीने खास अनोख्या पद्धतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Bappa is coming home!... अर्थात बाप्पा घरी येतोय असं कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. विमानातून बाप्पा प्रवास करत असल्याची काल्पनीक संकल्पना इंडिगो एअरलाईन्सने मांडली आहे. 19 सप्टेंबरला अर्थात गणेश चुतुर्थीला ज्या दिवशी बाप्पाचे आगमन होते. त्या दिवशी इंडिगो एअरलाईन्सने बाप्पाचा हा फोटो शेअर केला आहे. मात्र, हा फोटो आता चांगलाच व्हायरल होत आहे.    

Read More