Marathi News> भारत
Advertisement

भर मंडपात गाडीची मागणी, वधुच्या कुटुंबानं असा शिकवला धडा

विवाहाच्या अगदी काही वेळ अगोदर वरपक्षाकडून मोटारसायकल आणि सोन्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांसमोर ठेवण्यात आली

भर मंडपात गाडीची मागणी, वधुच्या कुटुंबानं असा शिकवला धडा

लखनऊ : भारत सरकार, सुप्रीम कोर्टद्वारे गाईडलाईन आणि कायदे करूनही देशातून हुंड्यासारख्या कुप्रता काही संपण्याचं नाव घेत नाहीत. परंतु, समोर आलेल्या घटनेत एका मुलीच्या कुटुंबीयांनी हुंडा मागणाऱ्या नवऱ्या मुलाला असा काही धडा शिकवलाय की त्यातून प्रत्येकानं काहीतरी धडा घ्यावाच... 

ही घटना उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊच्या इंदिरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत क्षेत्रात घडलीय. सोमवारी हा विवाह संपन्न होणार होता... परंतु, विवाहाच्या अगदी काही वेळ अगोदर वरपक्षाकडून मोटारसायकल आणि सोन्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांसमोर ठेवण्यात आली. इतकंच नाही तर वरपक्षानं आपली मागणी पूर्ण झाली नाही तर हा विवाह होणार नसल्याची धमकीही मुलीच्या कुटुंबीयांना दिली. 

fallbacks

या मागणीमुळे मुलीच्या कुटुंबीयांना पहिल्यांदा धक्काच बसला... त्यांचा हा धक्का रागात परावर्तीत झाला आणि त्यांनी नवऱ्या मुलालाच बंधक बनवलं... आणि त्याचं मुंडणही केलं.

यानंतर हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांनी रद्द करत मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर स्पष्टीकरण देताना नवऱ्या मुलानं, ही नवी मागणी नव्हती तर आपल्या कुटुंबानं विवाह ठरवतानाच गाडीची मागणी केली होती, असं म्हटलंय.  

Read More