Marathi News> भारत
Advertisement

शाळेची बस आणि ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

इंदूरमध्ये शाळेची बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शाळेची बस आणि ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

इंदूर : इंदूरमध्ये शाळेची बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शाळा सुटल्यानंतर डीपीएस स्कूल बस शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्याच दरम्यान बस आणि ट्रकची टक्कर झाली.

या अपघातात ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, बस चालकाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर विद्यार्थ्यांना तात्काळ उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

बस आणि ट्रकमध्ये झालेली ही टक्कर इतकी भीषण होती की बसचा पूढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

या घटनेसंदर्भात गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या घटनेची तात्काळ चौकशी करुन २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Read More