Marathi News> भारत
Advertisement

नवरदेवला कोरोना झाला म्हणून पीपीई किट घालून बोहल्यावर चढवला पाहा

देशात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आपल्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूण निर्बंध लावले आहेत.

नवरदेवला कोरोना झाला म्हणून पीपीई किट घालून बोहल्यावर चढवला पाहा

रतलाम : देशात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आपल्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूण निर्बंध लावले आहेत. अशातच लग्न समारंभानाही 2 तासाची आणि 20 ते 25 जणांच्या उपस्थितीत परवानगी दिली आहे. त्यामुऴे काही जोडप्यांनी आपले लग्नं पुढे ढकलले आहे. तर काही गुडग्याला बाशिंग बांधून बसलेली जोडपी मात्र आपले लग्न उरकून घेत आहेत.

अशाच एका अति ऊत्साहीत जोडप्याने कोरोना संसर्ग होवूनही लग्न समारंभ उरकलं. ही मध्य प्रदेशातील रतलाममधील घटना आहे. येथे वधू-वरपासून पंडितापर्यंत सर्वजण लग्नात पीपीई किट घालू आहेत.

या लग्नाचा व्हिडीओही समोर आला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, वधू आणि वर पीपीई किट्स परिधान करून सात फेऱ्या घेत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना कोरोना बाधित नवरदेवाच्या लग्नाची माहितीही मिळाली होती. यानंतर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलिस हे लग्न थांबविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. परंतु लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात रतलामचे तहसीलदार नवल गर्ग यांचे म्हणणे की,19 एप्रिल रोजी हा नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. ते पुढे म्हणाले की, "आम्ही लग्न थांबवण्यासाठी इथे आलो होतो. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंती आणि मार्गदर्शनानुसार हे लग्न पार पडले आहे." त्यांनी पुढे असेही सांगितले की, या जोडप्याने पीपीई किट्स परिधान करून लग्न केले, जेणे करुन कोरोना संक्रमण पसरणार नाही.

Read More