Marathi News> भारत
Advertisement

मध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला, काँग्रेसचा आकडा घसरला

मध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला आहे, काँग्रेसचा आकडा बहुमतापासून घसरला आहे. काँग्रेसचा आकडा १०८ वर आला आहे.

मध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला, काँग्रेसचा आकडा घसरला

भोपाळ : मध्य प्रदेशात पुन्हा डाव उलटला आहे, काँग्रेसचा आकडा बहुमतापासून घसरला आहे. काँग्रेसचा आकडा १०८ वर आला आहे, तर भाजपा ११२ जागांवर आहे, तर इतर आमदारांची संख्या १० वर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये काही वेळापूर्वी काँग्रेस बहुमताच्या जवळ होती, तेव्हा मुख्यमंत्री कोण होईल यावर कमलनाथ यांच्या घरी काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीला ज्योतिरादित्य आणि दिग्विजय सिंह उपस्थित आहेत. अशावेळी पुन्हा भाजपचा मध्यप्रदेशात आकडा वाढल्याची बातमी आली आहे.

क्रिेकेट आणि राजकारणात काहीही होवू शकतं, याचा प्रत्यय क्षणोक्षणी मध्य प्रदेशच्या राजकारणात येत आहे. येथे दर १५ मिनिटात परिस्थिती बदलत आहे. काँग्रेस आणि भाजपाचे नेते यामुळे गोंधळले आहेत, यामुळे आणखी किंग मेकर्सना महत्व आलं आहे. बसपाचे आमदार कुणाला मदत करणार यावरही पुढील राजकीय समीकरणं अवलंबून आहेत.

भाजपा पुन्हा बहुमताकडे जात असताना, भाजपाने सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपाला सहज मध्य प्रदेश हातातून सो़डायचं नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.

Read More