Marathi News> भारत
Advertisement

Video : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?

Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ   

Video : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?

Mahakumbh Video : देशोदेशीच्या साधुसंतांनी सध्या प्रयागराजची वाट धरली असून, निमित्त ठरतोय तो म्हणजे इथं सुरु असणारा महाकुंभ मेळा. आतापर्यंत 11 जानेवारी ते 16 जानेवारी या दिवसांपर्यंत महाकुंभमध्ये 7 कोटींहून अधिकजणांनी गंगास्नान केल्याची नोंद करण्यात आली आहे. हठयोगी असो, नागा साधू असो किंवा कोणी महंत असो, प्रयागराजमध्ये येत संगमावर पवित्र स्नान करत अध्यात्मिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी इथं अनेकांचीच पावलं वळताना दिसत आहेत. 

साधुसंतांच्या याच गर्दीत काही चेहरे मात्र सातत्यानं लक्ष वेधताना दिसत आहेत. त्यातलाच एक चेहरा म्हणजे एका अशा साधुंचा, ज्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून अनेकांचीच नजर हटत नाहीय. भारदस्त देहबोली, निळेशार डोळे, गळ्यात रुद्राक्षमाळ आणि चेहऱ्यावर प्रचंड तेज अशा रुपात दिसणाऱ्या या साधुंना नेटकऱ्यांनी 'मस्क्युलर बाबा' म्हणायला सुरुवात केली आहे. 

काहींनी त्यांची तुलना भगवान विष्णूचच एक रुप असणाऱ्या परशुरामाशी केली आहे, तर काहींनी हे साधू थेट त्रेता युगातूनच आल्याचं म्हणत त्यांच्या या रुपाबद्दल कुतूहलाची भावना व्यक्त केली आहे.  बुब्रिस्की नावाच्या इन्स्टाग्राम युजरनं या साधूंचा एक फोटो शेअर केला असून, त्यांचं नाव आत्मा प्रेम गिरि असल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती मुळची रशियाची असून, त्यांनी गेली काही वर्ष नेपाळमध्ये वास्तव्य केल्याचं कळतं. 

आत्मा प्रेम गिरी हे साधू पायलट बाबा यांचे शिष्य असून, जुना आखाडाचे सदस्य असल्याचं सांगितलं जातं. हिंदू धर्माविषयी असणाऱ्या कुतूहलापोटी त्यांनी तीस वर्षांपूर्वी शिक्षण आणि करिअरचा त्याग केला आणि अखेर अध्यात्माच्याच वाटेवर त्यांनी एक नवा प्रवास सुरू केला. हेच साधू सध्या महाकुंभ मेळ्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

त्रेता युग म्हणजे काय? 

हिंदू धर्मातील पुराणकथांमध्ये उल्लेख केल्यानुसार चार युगांपैकी दुसरं युग म्हणजे त्रेता युग. मानवकाळाचं हे दुसरं युग मानलं जातं. या युगाचा अवधी साधारण 12 लाख 96 हजार वर्ष इतका मानला जातो. हे तेच युग आहे ज्यामध्ये भगवान विष्णू यांनी राम, वामन आणि परशुराम हे अवतार धारण केले होती अशीही कथा सांगितली जाते. 

Read More