महाकुंभ मेळा लवकरच संपत आहे आणि महाशिवरात्रीला शेवटच्या स्नानाने हा उत्सव संपेल. अशा परिस्थितीत, लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रयागराजला पोहोचत आहेत. यासंबंधीचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका महिलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एवढंच नव्हे तर या महिलेचा प्रताप पाहून लोकं ही मॉडर्न पतिव्रता असल्याचंही सांगत आहेत.
महाकुंभमेळाशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण आमचा दावा आहे क, असा व्हिडीओ या अगोदर पाहिलेला नाही. व्हिडिओमध्ये, एक पत्नी तिच्या पतीला कुंभ स्नान करण्यासाठी प्रयागराजला येता आले नाही. म्हणून त्याला व्हिडीओ कॉल करते. एवढंच नव्हे तर ती पतीला महाकुंभ स्नानाच पुण्य मिळावं म्हणून चक्क व्हिडीओ कॉल सुरु असताना मोबाईल थेट पाण्यात बुडवताना दिसते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, संगमाच्या पवित्र पाण्याच्या मध्यभागी एक महिला उभी आहे. तिच्या केसांना सिंदूर लावला आहे आणि तिने हातात मोबाईल धरला आहे. ती तिच्या पतीशी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे आणि त्याच दरम्यान, ती त्याला पुण्य लाभावं यासाठी ऑनलाइन आंघोळ घालू लागते. यासाठी ती मोबाईल दोन-तीन वेळा पाण्यात बुडवते. या काळात ती हसत असते पण तिला याचा अंदाज येत नाही की, पुढे काय होणार आहे.