Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस

Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला.   

Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस

Viral Video of a sadhu : पवित्र महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली आणि भारतभूमीवर असंख्य साधूसंतांनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर मिळवलेली अध्यात्मिक ताकद जगासमोर आणल्याचं पाहायला मिळालं. कोणी वर्षानुवर्षे एका पायावर उभं आहे, कोणी एक हात वर करून उभं आहे, कोणा साधूमहंतांनी डोक्यावर चक्क रोपं उगवलीयेत... प्रत्येकाच्या अध्यात्मिक धारणेचं आणि भक्तीचं स्वरुप तितकंच वेगळं. अगदी अघोरी साधूसुद्धा यात मागे नाहीत. 

फक्त कुंभ मेळाच नव्हे, तर सोशल मीडियावरील वर्तुळातही सध्या काही साधूंचा प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे. अगदी परदेशी साधूंचाही यात समावेश असून, नुकतंच एका ऑस्ट्रेलियन साधूचा व्हिडीओ लक्ष वेधत आहे. सदर ऑस्टेलियन व्यक्ती दावा करत असल्यानुसार सुरुवातीला हो stripper होता. ज्यानंतर त्यानं बॉडिबिल्डींग क्षेत्रात कामगिरी सुरू केली आणि आता मात्र तो एक साधू म्हणून जगासमोर येत आहे. 

इतकंच नव्हे तर, तो अनेकांसाठीच वैयक्तिक प्रगती या मुद्द्यावर प्रेरणा देणारं एक व्यक्तीमत्त्वं म्हणूनही कामगिरी करताना दिसत आहे. Ash Edelman असं या व्यक्तीचं नाव असून, या संपूर्ण प्रवासाचं वर्णन तो 'एकाच जीवनात असंख्य रुपं जगतोय' (“living multiple lives in one life”) अशा शब्दांत करतो. 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये तो जीवनातील एका आव्हानात्मक प्रसंगी मिळणाऱ्या प्रसिद्धीमध्ये सातत्य राखण्यासाठी आपण नेमके कोणतेय प्रयत्न करत होतो हे सांगताना दिसतो. 

हेसुद्धा वाचा : Explainer : भारताची भूमी दुभंगून देशाचे होणार दोन भाग? भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितलं हादरवणारं वास्तव 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @imonastery_inter

सोशल मीडियावर आपण साधूसंतांच्या मार्गांचा अवलंब करत संन्यस्त जीवन जगत असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीवर सध्या सोशल मीडियाच्या वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. एडलमन संन्यस्त आयुष्य जगत असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. Consciously Ash नावाचा एक युट्यूब चॅनलही तो चालवतो. असा हा मॉडर्न साधू सध्या सोशल मीडियावर  भलताच चर्चेत आहे, ही अधोरेखित करण्याजोगी बाब. 

Read More