Mahindra & Mahindra Employees : बऱ्याचदा (Govt jobs) सरकारी क्षेत्रतील नोकरदारांना खासगी क्षेत्रातील नोकरदारांना हेवा वाटतो. विषय अनेक असतात. अगदी सुट्ट्यांपासून ते (Job Salary) पगार आणि पगारवाढीपर्यंत. पण, सर्वच खासगी क्षेत्रांमध्ये कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांचा हिताकडे दुर्लक्ष केलं जातं असंच नाही. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांपासून ते अगदी तीन महिन्यातून सक्तीच्या सुट्ट्या घेण्यासारखे नियमसुद्धा राबवतात. या साऱ्यामध्ये वेगळेपण जपलं आहे ते म्हणजे देशातील एक महत्त्वाच्या आणि अतिशय मानानं नाव घेतल्या जाणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनं. (Mahindra & Mahindra Shares)
उपलब्ध माहितीनुसार महिंद्रा उद्योग समुहानं कंपनीतील 23000 कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी घोषणा केली असून, या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीकडून ‘एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लान (ESOP)’ देण्यात येणार आहे. यामध्ये फक्त कार्यालयीन कामांतील कर्मचारीच नव्हे, तर कंपनीच्या कारखान्यांमध्ये मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचासुद्धा समावेश आहे.
PTI या वृत्तसंस्थेशी संवाद साधत असताना महिंद्रा समुहाचे सीईओ आणि व्यवस्थापकिय संचालक अनिश शाह यांनी यासंदर्भातील माहिती दिली. कंपनीच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि या प्रगतीमद्ये त्यांना सहभागी करून घेण्यासाठी ही योजन राबवण्यात येत असल्याचं शाह यांनी सांगितलं. महिंद्रा कंपनीच्या या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमामध्ये वाहन, कृषी विभाग, महिंद्रा इलेक्ट्रीक ऑटोमोबाईल, आणि महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
अनिश शाह यांनी या योजनेसंदर्भातील हेतू अगदी सोप्या शब्दांत मांडला. ‘मला आमच्या कंपनीमध्ये वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या संस्कृतीचं कौतुक वाटतं. या एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लान (ESOP) योजनेचा लाभ कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला घेता येणार असून आमची आभार मानण्याची ही एक पद्धतच आहे. कारण, कर्मचाऱ्यांच्याच चांगल्या प्रयत्नांमुळं आम्हाला एक संस्था म्हणून चांगलं काम करण्यासाठी मोठा हातभारा लागला आहे’, असं ते म्हणाले.
सदर शेअर योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना साधारण 400 ते 500 कोटींचे शेअर वितरित करण्याचा विचार कंनीनं केला असून, हा आकडा कंपनीचा मार्केट कॅप आणि इतक निकषांवर आधारित असेल. ही रक्कम मोठी असली तरीही कर्मचाऱ्यांच्या दमदार प्रदर्शनापेक्षाही ती मोठी नाही असं शाह यांनी स्पष्टच सांगितलं.
एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लान (ESOP) अंतर्गत कर्मचाऱ्यांना जे शेअर देण्यात येणार ते रिस्ट्रिक्टेड स्टॉक यूनिट्स (RSU) अर्थात काही अटीशर्थींसह असतील. या योजन साठी अट एकच असेल ती म्हणजे कर्मचारी 12 महिन्यांपासून अर्थात मागील वर्षभरापासून किंवा त्याआधीपासून कंपनीच्या पूर्णवेळ कर्मचारी कराराशी जोडला गेलेला असावा.
राहिला मुद्दा कंपनीच्या मार्केट कॅपचा, तर एप्रिल 2020 च्या तुलनेत हा आकडा 12 पटींनी वाढल्यानं आता कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळानं कर्मचाऱ्यांच्या योगदानासाठी त्यांना खास भेट देण्याचा निर्णय गेतला आहे. सध्याची आकडेवारी सांगावी तर जून तिमाहिमध्ये कंपनीनं ₹4,083 कोटींचा निव्वळ नफा कमवला होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा 24 टक्क्यांनी जास्त असल्याचं सांगण्यात येतं आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाने कोणती घोषणा केली आहे?
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाने सुमारे 23,000 कर्मचाऱ्यांना एकमुश्त एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOP) देण्याची घोषणा केली आहे. याची किंमत 400 ते 500 कोटी रुपये आहे आणि यात कारखान्यातील कामगारांचाही समावेश आहे.
ESOP म्हणजे काय?
ESOP (एम्प्लॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन) म्हणजे कर्मचार्यांना कंपनीच्या शेअर्सच्या स्वरूपात मालकी हक्क देणारी योजना आहे. यामुळे कर्मचारी कंपनीच्या यशात भागीदार बनतात आणि त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन मिळते.
ही योजना कोणत्या कर्मचार्यांना लागू आहे?
ही योजना महिंद्रा समूहातील कायमस्वरूपी कर्मचार्यांसाठी आहे, ज्यांनी कंपनीत किमान 12 महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे.