Marathi News> भारत
Advertisement

भाजप नेत्याच्या मुलाच्या 100 हून अधिक Se* व्हिडीओ क्लिप्स व्हायरल, पत्नीलाही दाखवायचा; धक्कादायक प्रकार समोर!

Mainpuri News: अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेल्या पुरुषाच्या पत्नीने महिला पोलिस ठाण्यात तक्रार केली. 

भाजप नेत्याच्या मुलाच्या 100 हून अधिक Se* व्हिडीओ क्लिप्स व्हायरल, पत्नीलाही दाखवायचा; धक्कादायक प्रकार समोर!

Mainpuri News: मध्य प्रदेशातील मंदसौर येथील भाजप नेत्याचे दिल्ली-मुंबई महामार्गावरील आक्षेपार्ह व्हिडिओचा वाद अजून शांत झाला नाहीय. असे असताना उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एका भाजप नेत्याच्या मुलाचे अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल होतायत. दरम्यान अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेल्या पुरुषाच्या पत्नीने महिला पोलिस ठाण्यात तक्रार केली. काय आहे हा संपूर्ण प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कोण?

मैनपुरीमधील भाजप महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्षा सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होतायत. साधारण 130 व्हिडिओ व्हायरल झाले असून हे व्हिडिओ अत्यंत अश्लील असल्याचे सांगितलं जातंय. व्हायरल व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी बनवण्यात आले आहेत. भाजप नेत्याचा मुलगा विवाहित असून व्हिडिओमध्ये दिसणारी महिलाही शहरातील रहिवासी असल्याचे सांगितले जातंय. शुभम गुप्ता हा नारायण ट्रेडर्स फर्मचा मालक असल्याची माहिती समोर येत आहे.

शुभमचा पत्नीशी वाद 

शुभम गुप्ताने 2021 मध्ये शीतल गुप्ताशी लग्न केले. पत्नी शीतल गुप्ताने पती शुभम गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या लोकांकडून अतिरिक्त हुंड्याच्या मागणीवरून माझा छळ केला जायचा अशी माहिती पत्नीने पोलिसांना दिली आहे. तसेच तिने पतीवर दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा आरोपही केला होता. आता महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होतायत.भाजप नेत्याच्या मुलाचा या कृत्यांवरून सुमारे 3 वर्षांपासून त्याच्या पत्नीशी वाद सुरू होता. काही दिवसांपुर्वी पती शुभमने पत्नीला सिगारेटचे चटके दिले होते. यानंतरही तिने पोलीस तक्रार केली होती. पण प्रकरण दाबून टाकण्यात आल्याचा आरोप पत्नीने केलाय. शुभम त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडिओ बनवायचा आणि ते त्याच्या पत्नीला दाखवायचा नंतर तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा, अशी माहितीही तिने पोलीस तक्रारीत दिली आहे. 

सीमा गुप्ता यांच्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

'माझी आई भाजप नेता आहे. ती मोठ्या नेत्यांसोबत फिरते. कोणीही माझं काही वाकडं करु शकणार नाही. मी जे काही करायचे ते करेन', असे शुभम गुप्ता आपली पत्नी शीतल गुप्ताला वारंवार सांगायचा. शुभमने मला घरात कोंडून ठेवले उपाशी ठेवल्याचा आरोप केला आहे. शीतलच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा पती शुभम गुप्ता आणि सासू सीमा गुप्ता यांच्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

त्या महिलेकडूनही तक्रार दाखल

ज्या महिलेसोबत व्हिडिओ व्हायरल झाला होता तिनेही असेच केले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेने शुभमची पत्नी शीतल गुप्ता यांच्यासह 3 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केलाय. प्रियकरासह व्हिडिओ व्हायरल झाल्याने माझी प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप त्या महिलेने केलाय.

Read More