Marathi News> भारत
Advertisement

Pulwama Attack : देशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते? ममता बॅनर्जींचा सवाल

हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कसा लागला नाही?

Pulwama Attack : देशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते? ममता बॅनर्जींचा सवाल

कोलकाता : Pulwama Attack  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे हा प्रसंग ओढावल्याचं वक्तव्य केलं. देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. नेतेमंडळींच्या निधनानंतरच दुखवटा जाहीर केला जाणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

नवी दिल्लीहून परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 'मी ७२ तासांच्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात यावा अशी मागणी करत आहे. या बलिदानासाठी आणि निदान राष्ट्राच्या सन्मानासाठी हे पाऊल उचलण्यात यावं', असं त्या म्हणाल्या. सरकार आणि इतर सर्व राजकीय पक्षांनी येत्या काही तासांसाठी त्यांची सर्व कामं थांबवत या हल्ल्याचा निषेध करण्याची मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा कार्यक्रम पाहून आपली नाराजी झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

विरोधी पक्षातील कोणीच या प्रसंगी काहीही वक्तव्य करण्यास नकार दिला असून, आपण या प्रसंगाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणत असल्याचं म्हणत त्यांनी देशाच्या सुरक्षा सल्लागारांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. 'त्या वेळी नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. कारण, तेव्हा देशाचे सुरक्षा सल्लागार नेमकं काय करत होते?  हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कसा लागला नाही? इतके जनावान मारले गेलेच का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी सिरक्षा सल्लागारांवर निशाणा साधला. सध्याच्या घडीला झालेल्या हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंच पाहिते असं म्हणत त्यांनी थेट शब्दांमध्ये या घटनेचा निषेध केला. 

Read More