Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : मैत्री असावी तर अशी... नववधुची मैत्रिणीसोबत लग्न मंडपात भन्नाट एन्ट्री

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यातसोबत असते ती म्हणजे 'मैत्री'

Viral Video : मैत्री असावी तर अशी... नववधुची मैत्रिणीसोबत लग्न मंडपात भन्नाट एन्ट्री

मुंबई : आपल्या जवळच्या आणि खास मैत्रिणीचं लग्न म्हटलं की नुसती धम्माला. आपली मैत्रीण नव्या आयुष्याची सुरूवात करणार म्हणून आनंद फार असतो पण ती आपल्यापासून आता दूर जाणार म्हणून थोडं वाईट देखील वाटतं. पण मैत्रिणीच्या लग्नात तिच्या मैत्रिणींचा वावर हा सर्वात मोठा चर्चेत विषय असतो. अशाचं दोन मैत्रिणींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये,  मैत्रिणीनेचं नवरीला लग्नमंडपात आणलं आहे. सोशल मीडियावर ही भन्नाट एन्ट्री सध्या तुफान व्हायरल तर होतचं आहे पण या व्हिडिओबद्दल जोरदार चर्चा देखील रंगत आहेत. या व्हिडिओमधील दोन मैत्रिणींमधील असलेलं प्रेम कौतुकास्पद आहे. 

महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर Witty Wedding नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 17 हजारांपेक्षा जास्त युझर्सने पाहिला आहे. व्हिडिओमधील दोन मैत्रिणींचा अंदाच सर्वांच्या पसंतीस पडला आहे. 

Read More