Marathi News> भारत
Advertisement

जाणून घ्या, निता अंबानी यांच्या छोट्या बहिणीबद्दल...

 ममता दलाल या मात्र लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत करतात 

जाणून घ्या, निता अंबानी यांच्या छोट्या बहिणीबद्दल...

मुंबई : भारताचे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी देशातील चर्चेतलं जोडपं... अनेकदा या कुटुंबाच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या 'रॉयल लाईफ'ची चर्चा जोरावर असते. परंतु, या कुटुंबाशी निगडीत काही सदस्य मात्र फार ओळखीचे नाहीत... उदाहरणच द्यायचं झालं तर नीता अंबानी यांची लहान बहिण ममता दलाल... 

मुकेश अंबानी यांची मेव्हणी आणि आकाश अंबानीची मावशी ममता दलाल... ममता यांची लाईफस्टाईल मात्र आपली मोठी बहिण निता अंबानी यांच्याहून खूपच वेगळी आहे. नीता अंबानी या सतत मीडियात चर्चेत असतात मात्र त्यांचीच छोटी बहिण ममता दलाल या मात्र लाईमलाईटपासून दूर राहणंच पसंत करतात. 

fallbacks
ममता दलाल

रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांची मेव्हणी ममता दलाल या धीरुभाई अंबानी शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात... हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे... शाहरुख खान, ऐश्वर्या राय, रवीना टंडन, करिश्मा कपूर यांसारख्या बीटाऊनची मुलं ज्या शाळेत शिक्षण घेतात त्याच धीरुभाई अंबानी शाळेत  ममता या मुलांना शिकवतात.

माझ्यासाठी शाळेतील विद्यार्थी स्टार किडस् नसतात तर ते केवळ माझे विद्यार्थी असतात, असं ममता यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

Read More