Marathi News> भारत
Advertisement

स्वत:ला पंतप्रधानांचा अध्यात्मिक गुरू म्हणवणारा ठग गजाआड

दिल्ली पोलिसांनी पीएमओच्या तक्रारीनंतर ऑगस्टमध्ये याविरुद्ध तक्रार दाखल केली.  

स्वत:ला पंतप्रधानांचा अध्यात्मिक गुरू म्हणवणारा ठग गजाआड

नवी दिल्ली :  स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अध्यात्मिक गुरू म्हणवून VIP सुविधा मिळवू पाहणाऱ्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे. पुलकित मिश्रा असे याचे नाव असून तो पुलकित महाराज नावाने ओळखला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते या इसमाचा सन्मान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचं नाव सांगून दादागिरी करणाऱ्यांची संख्याही कमी नसल्याचे याआधी निदर्शनास आलंय.

पीएमओची तक्रार 

पुलकित महाराज स्वत: ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अध्यात्मिक गुरू म्हणवून वेगवेगळ्या राज्यात व्हीआयपी सुविधा आणि सुरक्षा मागायचा. दिल्ली पोलिसांनी पीएमओच्या तक्रारीनंतर ऑगस्टमध्ये याविरुद्ध तक्रार दाखल केली.  

असिस्टंट डायरेक्टर स्तराच्या पीएमओ अधिकाऱ्याने पुलकितविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांना याच्यासंदर्भात अनेत तक्रारी आल्या होत्या.

राष्ट्रपतींकडून सन्मान ? 

याआधी एका इसमाने सीतापुर, युपीच्या डीएमना पत्र लिहून पुलकितच्या राहण्याची आणि सुरक्षेची मागणी केली होती. आपण कला आणि सांस्कृतिक मंत्रालयातून बोलत असल्याचे त्याने सांगितले. खूप साऱ्या व्हीआयपी लोकांसोबत त्याचे फोटो आहेत.  या राष्ट्रपतींनी सन्मान केल्याचे सांगतही व्हीआयपी सुविधा घेत असे. 

Read More