Marathi News> भारत
Advertisement

चक्क Toilet Seat वर बसून हायकोर्टाच्या सुनावणीत दाखल; एवढ्यावरच थांबला नाही पठ्ठ्या.... पाहा काय केलं?

Viral Video : उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान एक व्यक्ती चक्क शौचालयातून सहभागी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

चक्क Toilet Seat वर बसून हायकोर्टाच्या सुनावणीत दाखल; एवढ्यावरच थांबला नाही पठ्ठ्या.... पाहा काय केलं?

Gujarat High Court Hearing Viral Video: दररोज सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यावेळी गुजरातच्या उच्च न्यायालयाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्यक्तीने न्यायालयाचा अपमान केला आहे. त्याच्याबरोबर पुढे जे झालंय ते अक्षरश: धडकी बसवणारं आहे. 

हा व्हिडिओ गुजरात उच्च न्यायालयातील एका ऑनलाइन सुनावणीचा आहे, जिथे एका व्यक्तीने टॉयलेटमध्ये बसून सुनावणीला हजेरी लावल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, ती व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून कामकाजात सहभागी होत असल्याचे दिसून येते.

ही व्यक्ती 'समद बॅटरी' या नावाने ऑनलाइन आली होती. हे प्रकरण २० जून रोजी न्यायमूर्ती नीरज एस देसाई एका खटल्याची सुनावणी करत असताना सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये पिवळ्या टी-शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने मोबाईल फोनवरून लॉग इन केल्याचे दिसत आहे. स्क्रीनवर त्याचे नाव 'समद बॅटरी' लिहिलेले दिसत आहे. धक्कादायक गोष्ट अशी आहे की, व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जेव्हा तो लिंकद्वारे कामकाजात सामील होत होता. तेव्हा तो टॉयलेट सीटवर बसला होता.

कोविड-१९ साथीच्या आजारापासून गुजरात उच्च न्यायालयाने वकील आणि याचिकाकर्त्यांना ऑनलाइन माध्यमातून कामकाजात सामील होण्याची परवानगी दिली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. प्रत्येक सुनावणी न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपित केली जाते.

कसा कळला हा प्रकार?

सुमारे एक मिनिटाच्या या छोट्या व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीने शौचालयाच्या जमिनीवर मोबाईल फोन ठेवल्याचे दिसून येते आणि कॅमेरा त्याच्या दिशेने आहे. शौचालयात आपले दैनंदिन काम केल्यानंतर, त्या व्यक्तीने फोन उचलला आणि निघून गेला. व्हिडिओ पाहून असे दिसते की, कदाचित न्यायमूर्ती देसाईंना त्यांची स्थिती लक्षात आली नसेल.

कुठे घडला हा प्रकार?

नंतर त्याच व्यक्तीने पुन्हा इअरफोन लावून लॉग इन केले आणि यावेळी तो एका खोलीत त्याच्या पाळीची वाट पाहत बसलेला दिसला. सुमारे १० मिनिटांनंतर, न्यायमूर्ती देसाई यांनी त्याचे नाव विचारले आणि त्यांनी त्याला सांगितले की, त्याचे नाव अब्दुल समद आहे, जो सुरतमधील किम गावचा रहिवासी आहे आणि एका मारहाण प्रकरणातील तक्रारदार आहे. या प्रकरणाने व्हर्च्युअल कोर्टात वारंवार होणाऱ्या बेशिस्त घटनांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोर्टाच्या नोंदीनुसार, ही व्यक्ती एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत प्रतिवादी होती. विशेष म्हणजे, तो या प्रकरणातील मूळ तक्रारदार देखील होता. न्यायालयाने सौहार्दपूर्ण समझोत्याच्या आधारे प्रकरण मिटवले आणि एफआयआर रद्द केला.

न्यायालयाने ठोठावला दंड 

व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अशा प्रकारची कृत्ये उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिलच्या सुरुवातीला, गुजरात उच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान धूम्रपान केल्याबद्दल एका वादीला ₹50000 चा दंड ठोठावला होता. मार्चमध्ये दिल्ली न्यायालयातही अशीच एक घटना घडली होती. हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिले, आपण अशी आशा करू शकतो का की किमान वादी सुनावणीदरम्यान शौच करणार नाही? अरे देवा. या पोस्टला 65 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 500 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ते न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध म्हटले आहे, तर काहींनी ते बनावट व्हिडीओ म्हटले आहे.

Read More