Marathi News> भारत
Advertisement

अवॉर्ड मिळाल्याच्या आनंदात स्टेजवर नाचत पोहचला अन हार्ट अटॅकनं कोसळला...

जेव्हा एखाद्या व्यक्तीला सन्मानित केलं जातं तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील उत्तम क्षणांपैकी एक असतो. प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार त्याचं सेलिब्रेशन करतं. पण या सेलिब्रेशनच्या उत्साहामध्ये मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना आग्रा येथे घडली आहे.  

अवॉर्ड मिळाल्याच्या आनंदात स्टेजवर नाचत पोहचला अन हार्ट अटॅकनं कोसळला...

आग्रा: जेव्हा एखाद्या व्यक्तीला सन्मानित केलं जातं तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील उत्तम क्षणांपैकी एक असतो. प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार त्याचं सेलिब्रेशन करतं. पण या सेलिब्रेशनच्या उत्साहामध्ये मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना आग्रा येथे घडली आहे.  

नाचत गेला मंचावर 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग्रा तेथील ताजगंज मधील एका हॉटेलमध्ये ट्रॅवल एजन्सीचा कार्यक्रम  सुरू होता. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून विष्णू चंद्र दूधनाथ पांडे पोह्चले होते. या कंपनीमध्ये विष्णू पांडे अ‍ॅडमीन एक्सिक्युटीव्ह म्हणून काम करत होते. 

कार्यक्रमामध्ये विष्णू पांडेंना मंचावर सन्मानित करण्यासाठी बोलावले होते. नाचताच विष्णूजी मंचावर पोहचले.  मंचावरही ते खूपवेळ नाचत होते. मात्र अवॉर्ड घेण्यापूर्वीच त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. 

fallbacks


हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधी मृत्यू  


मंचावर विष्णू पांडे पडल्यानंतर त्यांना जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा म्रत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आनंदाच्या भरात बेफाम झालेल्या विष्णूजींचा हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. 

Read More