Marathi News> भारत
Advertisement

नांदायला वैतागली म्हणून पाठवली नोटीस, पतीनं उचललं टोकाचं पाऊल

पत्नीशी भांडला आणि जीवानीशी गेला, सात जन्माचं वचनच ठरलं त्याच्या मृत्यूचं कारण

नांदायला वैतागली म्हणून पाठवली नोटीस, पतीनं उचललं टोकाचं पाऊल

हरियाणा : वाद होत नाहीत असे कोणतेही नवरा बायको नसतील. कधीकधी छोटे तर कधी मोठ्या गोष्टींवरून खूप जास्त वाद होत राहतात. पण हेच वाद कधी टोकाची भूमिका घेतील याचा काही नेम नसतो. भांडणात एकानं नमतं नाही घेतलं तर मोठा अनर्थ होते. असाच अनर्थ घडला आणि दोन आयुष्य उद्ध्वस्त झाली. 

लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्याऐवजी दोघांमध्ये सतत खटके उडायला लागले. त्यामुळे वैतागलेली पत्नी माहेरी निघून गेली. रोजरोजच्या भांडणाला कंटाळलेल्या पत्नीनं पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. ही नोटीस पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. 

या घटनेनंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पती-पत्नी दोघांमध्ये पटत नव्हतं. त्यांच्या भांडणामुळे अनेकदा पंचायतही बसवण्यात आली होती. 

तरुणाने आयुष्य संपवण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. मृत तरुणाच्या वडिलांनी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या कुटुंबातील 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read More