Marathi News> भारत
Advertisement

क्षणार्थात 'तो' झाला मालामाल; देशातील 'या' भागात सापडला लाखो रुपये किंमतीचा हिरा

या मौल्यवान हिऱ्याची किंमत ....

क्षणार्थात 'तो' झाला मालामाल; देशातील 'या' भागात सापडला लाखो रुपये किंमतीचा हिरा

नवी दिल्ली : कोणाचं नशिब कसं आणि कुठे फळेल याचा काही नेम काही, असं अनेकजण म्हणतात. याचाच प्रत्यय आता आला आहे. कारण, खाणीत खोदकाम करतेवेळी एका ३५ वर्षीय व्यक्तीला जवळपास १०.६९ किंमतीचा अतिशय मौल्यवान असा हिरा सापडल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी, ही घटना देशाती मध्य प्रदेश या राज्यात घडली. 

हिऱ्यांच्या खाणींसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात सापडलेल्या या मौल्यवान हिऱ्याची किंमत ही जवळपास ५० लाख रुपयांपासून कोट्यवधींच्या घरात असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.  मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका खाणीत हा हिरा सापडला आहे. त्याचविषयी अधिकारी आर.के. पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार आनंगी लाल कुशवाहा नामक व्यक्तीला १०.६९ कॅरेट वजनाता अतिशय मौल्यवान असा हिरा सापडला. 'भाषा'शी संवाद साधतेवेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. 

पन्ना येथील जिल्हा मुख्यालापासून जवळपास १५ किलोमीटर दूर असणाऱ्या राणीपूरच्या उथली येथील हिऱ्याच्या खाणीत खोदकाम करत असतेवेळी त्यांना हा हिरा सापडला. कुशवाहा यांनी हा हिरा संबंधित कार्यालयात जमा केला आहे. ज्यानंतर त्याचा पुढील प्रक्रियेअंतर्गत लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या हिऱ्याच्या लिलावातून जी रक्कम हाती येणार आहे, त्यातून कराची रक्कम कमी करत उर्वरित सर्व रक्कम ही त्या खोदकाम करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार आहे. 

 

आनंदी लाल कुशवाहा म्हणजेच खोदकाम करणाऱ्या व्यक्तीला याबाबत विचारलं असता ते म्हणाले, 'यापूर्वीसुद्धा मला या खाणीत खोदकाम करतेवेळी ७० सेंट चा हिरा सापडला आहे आणि आता तर, मला १०.६९ कॅरेटचा हिरा सापडला आहे'. कुशवाहा यांना काम करतेवेळी सापडलेल्या याच हिऱ्यामुळं खऱ्या अर्थानं ते मालामाल झाले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. 

 

Read More