Marathi News> भारत
Advertisement

कुत्र्यासहीत धावती ट्रेन पकडायला गेला अन्...; घडलेला प्रकार पाहून लोक म्हणाले, 'कायमचा जेलमध्ये टाका'

Man Try To Board Running Train With His Dog: धावत्या ट्रेनमध्ये चढताना आधी कुत्रा ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला पण...

कुत्र्यासहीत धावती ट्रेन पकडायला गेला अन्...; घडलेला प्रकार पाहून लोक म्हणाले, 'कायमचा जेलमध्ये टाका'

Man Try To Board Running Train With His Dog: आतापर्यंत तुम्ही ट्रेनच्या अपघाताचे अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिले असतील. कधी रेल्वे ट्रॅक ओलांडताना झालेला अपघात तर कधी प्लॅटफॉर्मवरुन रुळांवर पडल्याने प्राण गमवावे लागल्याच्या घटनांचे व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाल्याचं दिसून आलं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि विचित्र पद्धतीने अपघात होत असले तरी लोक ट्रेनसंदर्भात स्टंटबाजी तसेच धोका पत्कारत धावती ट्रेन पकडण्याच मोह टाळत नाहीत. यामुळे ते स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. 

नेमकं घडलं काय?

या व्हिडीओमध्ये एक सुशिक्षित दिसणारा इसम आपल्या पाळीव कुत्र्‍याला धावत्या ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र या प्रयत्नामध्ये असं काही भंयकर घडलंय की अनेकांनी या व्यक्तीला आयुष्यभरासाठी तुरुंगात टाका अशी मागणी केली आहे. एक्सवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीमध्ये निळ्या रंगाच्या टी-शर्टमधील व्यक्ती त्याच्या हाताला पट्ट्याने बांधलेला कुत्रा ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र प्लॅटफॉर्मवरुन धावताना आणि ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात कुत्र्‍याचे पाय सरकतात. कुत्रा घसरुन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील फटीत अडकतो.

कुत्रा पडल्यानंतर बघ्यांची गर्दी...

कुत्रा घसरुन ट्रॅक आणि ट्रेनमध्ये अडकलेला असतानाच मालक कुत्र्‍याच्या गळ्यातील पट्ट्याने त्याला वर ओढण्याचा प्रयत्न करतो. मात्र तितक्यात या कुत्र्याच्या गळ्यातील पट्टाही सुटतो आणि कुत्रा ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमधून खाली जातो. हा कुत्रा ट्रेनखाली गेल्यानंतर मालक ट्रेन जाण्याची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचं दिसत आहे. कुत्रा ट्रेनखाली गेल्याचं पाहिल्यानंतर अनेकांनी कुत्र्‍याचा शोध घेण्यासाठी मालकाला मदत करण्याच्या हेतूने त्याच्याभोवती गर्दी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र कुत्रा ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत सरकून गेल्यानंतर कोणालाच काही करता आलं नाही. काहींनी हात वगैरे दाखवून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. तुम्हीच पाहा हा धक्कादायक व्हिडीओ....

संभाळता येत नसेल तर पाळू नका; लोक संतापले

या कुत्र्याचं काय झालं हे व्हिडीओमधून समोर आलेलं नाही. सदर घटना कुठे घडली, कधी घडली याचा तपशीलही समोर आलेला नसल्याने कुत्रा जगला की वाचला याबद्दल स्पष्टता नाही. मात्र अनेकांनी या कुत्र्याचा जीव वाचला असला तरी प्राण्यावर अत्याचार करुन त्याचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी मालकाला कायमचा तुरुंगात टाका अशी मागणी केली आहे. 'त्या बिचाऱ्या कुत्र्याचा काय दोष होता?' असा सवाल एकाने विचारला आहे. "कुत्र्याचं काय झालं?" असं अनेकांनी विचारलं असून बऱ्याच जणांनी 'कुत्रा जीवंत असेल अशी प्रार्थना करतो,' असं म्हटलंय. "संभाळता येत नसतील तर प्राणी पाळू नका," असा सल्ला एकाने दिला आहे. अन्य एकाने हल्ली लोक केवळ शो ऑफसाठी प्राणी पाळतात, असं म्हटलंय.

fallbacks

काहींनी तर थेट प्राणी संरक्षणासाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेला टॅग करत या माणसाला शोधून शिक्षा झाली पाहिजे, असं बघा अशी मागणी केली आहे.

Read More