Marathi News> भारत
Advertisement

भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिराबाहेर खोदेल तिथे सापडत आहेत मानवी सांगाडे; 100 हून अधिक महिलांवर बलात्कार करुन दफन केल्याचा दावा

भारतातील प्रसिद्ध मंदिराबाहेर 100 पेक्षा अधिक महिलांचे मृतदेह नग्न अवस्थेत आढळ्याचा दावा एका व्यक्तीने केला आणि यामुळे एकच खळबल उडाली.  या  दाव्यामुळे भारतातील सर्वात मोठे बलात्कार प्रकरण आणि हत्यांकाड उघडकीस आले आहे. पोलिसांनी आता तपास सुरु केला असून मृतदेह शोधळण्यास सुरुवात केली आहे. 

भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिराबाहेर खोदेल तिथे सापडत आहेत मानवी सांगाडे; 100 हून अधिक महिलांवर बलात्कार करुन दफन केल्याचा दावा

Mangalore Crime News :  भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील पवित्र मंदिराबाहेर झालेल्या सामूहिक दफन घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. माजी स्वच्छता कर्मचाऱ्याच्या खळबळजनक खुलाशानंतर सुरू झालेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात गुरुवारी 31 जुलै 2025 रोजी खळबळजनक पुरावे सापडले आहेत.  नेत्रावती नदीच्या स्नानघाटाजवळील साइट क्रमांक 6 येथे 4 फूट खोलीवर अर्धवट मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले आहेत.  100 हून अधिक महिलांवर बलात्कार करुन त्यांना येथे दफन केल्याचा दावा करण्यात आला आहे.

तपासाच्या तिसऱ्या दिवशी, एका ठिकाणाहून सुमारे 15 हाडे सापडली, जी एका पुरूषाचे अवशेष असल्याचे सांगितले जात आहे. हे अवशेष एका वनक्षेत्रातील नेत्रावती नदीजवळील 4 फूट खोलीतून बाहेर काढण्यात आले. हे ठिकाण 13 कथित दफनस्थळांपैकी सहावे आहे, जे एका माजी सफाई कामगाराने ओळखले आहे. त्याने आरोप केला आहे की त्याला 1195 ते 2014  दरम्यान येथे 100 हून अधिक मृतदेह जबरदस्तीने दफन करण्यास भाग पाडण्यात आले. त्याने असेही म्हटले आहे की त्यापैकी बहुतेक महिला आणि अल्पवयीन होते.

 एसआयटी अधिकाऱ्यांनी सांगितले की सापडलेल्या काही हाडांचे तुकडे झाले होते, परंतु कवटी सापडली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या फॉरेन्सिक डॉक्टरांनी सुरुवातीला अंदाज लावला होता की हे अवशेष एका पुरूषाचे आहेत. तथापि, त्याची अंतिम पुष्टी सविस्तर फॉरेन्सिक तपासणीनंतरच करता येईल. फॉरेन्सिक तज्ञ आणि एसआयटी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अवशेषांची माहिती नोंदवली आहे आणि ती जप्त केली आहेत. या उत्खनन मोहिमेदरम्यान पुत्तूर उपविभागाच्या सहाय्यक आयुक्त स्टेला वर्गीस स्वतः उपस्थित होत्या.

दोन दिवसांपूर्वी, एसआयटीने पहिल्या दफनभूमीवरून पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड सापडले होते. तथापि, मंगळवार आणि बुधवारी खोदलेल्या इतर पाच ठिकाणी कोणतेही मानवी अवशेष सापडले नाहीत. एसआयटी अधिकाऱ्यांनी सांगितले की पहिल्या ठिकाणावरून सापडलेले कार्ड एका व्यक्तीचे होते जो मद्यधुंद अवस्थेत होता आणि कदाचित मंदिराच्या यात्रेदरम्यान त्याचे कागदपत्रे हरवले असतील.

या प्रकरणातील मुख्य तक्रारदार हा माजी सफाई कामगार आहे. की त्याला वर्षानुवर्षे अनेकांचे मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आले. 100 हून अधिक मृतदेह गुप्तपणे दफन केल्याचा दावा या सफाई करम्चाऱ्याने केला आहे. त्याच्या साक्षीच्या आधारे, एसआयटीने 13 संभाव्य कबरस्थाने ओळखली आणि खोदकाम सुरू केले. गुरुवारी, तपासाला गती देत एसआयटीमध्ये 9 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे आता हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले जात आहे. येत्या काही दिवसांत, सर्व ठिकाणांचे खोदकाम पूर्ण केले जाईल आणि फॉरेन्सिक आणि डीएनए तपासणीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

Read More