Marathi News> भारत
Advertisement

मराठा आरक्षण: दिल्लीत महत्त्वाची बैठक;मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मराठा आरक्षण: दिल्लीत महत्त्वाची बैठक;मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

नवी दिल्ली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीत बैठक बोलविल्याचे वृत्त आहे. राज्यभरात सुरू असलेल्या मराठा मोर्चाकडे दिल्ली बारीक लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मराठा मोर्चाला मिळालेले वळण पाहता ही कोंडी फुटणार कशी, याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीमुळे आता हा प्रश्न दिल्लीश्वरांच्या कृपेनेच सुटणार की काय अशी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Read More