Marathi News> भारत
Advertisement

विनाहुंडा निघाली नवऱ्यामुलीची वरात

लग्नात नवऱ्यामुलाच्या वरातीमध्ये लोकांना नाचताना खूपवेळा पाहिलं असेल, मात्र तुम्ही कधी नवऱ्या मुलीची वरात पाहिलीये का? दानापूरमध्ये अशाच प्रकारे एका नवऱ्यामुलीची वरात निघाली होती.

विनाहुंडा निघाली नवऱ्यामुलीची वरात

दानापूर : लग्नात नवऱ्यामुलाच्या वरातीमध्ये लोकांना नाचताना खूपवेळा पाहिलं असेल, मात्र तुम्ही कधी नवऱ्या मुलीची वरात पाहिलीये का? दानापूरमध्ये अशाच प्रकारे एका नवऱ्यामुलीची वरात निघाली होती.

दानापूरच्या आनंदबाजार येथील आर्मी मॅरेज हॉलमध्ये स्नेहा उर्फ स्नेहलता हिचे लग्न होते. यावेळी स्नेहाची रथामध्ये बसून हॉलवर वरात आली. यावेळी नवरामुलगा अनिल कुमार यादव हॉलमध्ये नवरीची वाट पाहत होता.

या अनोख्या लग्नाची चर्चा संपूर्ण गावात झाली. यावेळी लग्नात कोणत्याही प्रकारचा हुंडा घेण्यात आला नाही.

नवरीमुलीची वरात काढण्याआधी दोन्ही कुटुंबांनी परवानगी दिली होती. त्यानंतरच नवऱ्यामुलीची वरात काढण्यात आली. बिहारसारख्या राज्यांमध्ये हुंडा न देता लग्न करणे म्हणजे अशक्यच. मात्र स्नेहाने हुंडा  न घेता लग्न करत नवा पायंडा पाडलाय. 

Read More