गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनदरमधील एका नविवाहित महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तब्बल 50 तासांपासून ही नववधू सासरच्या घराच्या गेटवर धरणे आंदोलनावर बसल होती. या नववधूचं नाव शालिनी संगल तर पतीचं नाव प्रणव सिंघल असं आहे. स्थानिक नेत्यांनी दोन्ही कुटुंबात तडजोडी करुन या सूनेचं आंदोलन संपुष्टात आणलं. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.
खरंतर, या आंदोलन करत शालिनीने तिचा नवरा प्रणववर गंभीर आरोप केले होते. ती म्हणाली की, प्रणवने लग्नानंतर 50 लाख रुपये मागितले. जेव्हा तिने ते देण्यास नकार दिला, तेव्हा तो तिला तिच्या पालकांच्या घरी सोडून निघून गेला. तिला परत घेऊन जात नव्हता. जेव्हा ती स्वतःहून तिच्या सासरच्या घरी परतली तेव्हा घराचा दरवाजा तिच्यासाठी उघडला नाही. म्हणूनच मला माझ्या सासरच्या घराबाहेर धरणे धरावे लागले. हा संपूर्ण वाद हनिमूनवरून परतल्यानंतर सुरू झाला. हे जोडपे त्यांच्या हनिमूनसाठी इंडोनेशियातील बालीमध्ये गेले होते. तिथे त्यांच्यात वाद झाला.
पत्नीने केलेल्या आरोपांवर प्रणव यांनी पलटवार केलाय. तो म्हणाला की, त्यांनी कोणत्याही पैशाची मागणी केली नव्हती. लग्न झाल्यापासून पत्नीने मला शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत. ती मला प्रत्येक वेळी धमकी द्यायची की जर तू मला हात लावलास तर मी तुझ्याविरुद्ध खटला दाखल करेन, मी एक वकील आहे.
शालिनी आणि प्रणव यांचं लग्न यावर्षी 12 फेब्रुवारी रोजी झालं. लग्नानंतर दोघेही हनिमूनसाठी इंडोनेशियामधील बालीला गेले. शालिनीने आरोप केला की, लग्नापासून तिच्या सासरच्या लोकांना ती आवडत नव्हती. मधुचंद्राच्या वेळी, नवरा विचित्र वागला आणि बोलत नव्हता. हुंडा म्हणून फक्त 50 लाख रुपये मागितले. आता तिला तिच्या सासरच्या घरात प्रवेश मिळत नाहीये. दुसरीकडे, प्रणव म्हणाला की, लग्नापासून शालिनीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत. पतीने असेही म्हटले की त्याला शालिनीकडून त्याच्या जीवाला धोका होता.
तब्बल 50 तासांनंतर पती पत्नीमधील वाद मिटला आहे. शालिनीला तिचा पती प्रणव सिंघलच्या घरात प्रवेश मिळाला आहे. शहरातील अनेक प्रतिष्ठित लोक वाद सोडवण्यासाठी पुढे आले. सपा, आरएलडी आणि भाजपचे नेतेही पुढे आले आणि त्यांनी या जोडप्याला तडजोड करायला लावली.
या प्रकरणात, शालिनीचे काका आशिष कुमार यांनी सांगितलं की, दोन्ही मुलांमध्ये मतभेद होते. ज्यावर दोघांशीही बोलणे झाले आणि दोघांचेही एकमत झाले. सध्या तरी, शालिनीला तिच्या सासरच्यांनी घरात नेले आहे. आचा हे जोडपे आनंदाने जगत आहे, असं सांगण्यात आलंय.