Gold Rate Today: टॅरिफ वॉर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजारातील तणाव याचा परिणाम थेट सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशातंर्गंत बाजार दोन्हीकडे सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं पहिल्यांदा 3,240 डॉलर प्रति औंसवर पोहोचत एक नवीन उच्चांक गाठला आहे. याचे कारण डॉलरची होणारी घसरण आणि वाढते व्यापार युद्ध यामुळं गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढत आहे. आज काय आहेत सोन्या आणि चांदीचे दर जाणून घेऊया.
चांदी अडीज टक्क्यांनी उसळून 31 डॉलरच्या वर पोहोचली आहे. तर टॅरिफ वॉरमुळं पसरलेल्या अनिश्चिचततेमुळं डॉलरदेखील कमजोर होताना दिसत आहे. त्यामुळं वायदे बाजारात पहिल्यांदा सोनं 93,000 हजारांच्या वर पोहोचले आहे. आज सकाळी MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोनं ओपनिंगलाच 1500 रुपयांपर्यंत उसळलं होतं. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास यात 1286 रुपयांची तेजी आली आणि सोनं 93,319 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदी यावेळी 821 टक्क्यांनी वाढून 92,416 रुपयांवर ट्रेड करत आहे. यापूर्वी चांदी 91,595 रुपयांवर स्थिरावली होती.
मुंबईत आज सोन्याचे दर (Gold Rate Today In Mumbai)
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे दर 8,561 रुपये प्रति ग्रॅम आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम 9339 रुपये प्रति ग्रॅम आहे
18 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम 7005 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे.
कमोडिटी एनालिस्टनुसार, ट्रम्पने चीनवर 145 टक्क्यांची टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर स्टॉक्स मार्केटमध्ये घसरण झाल्याची नोंद आहे. तर, एकीकडे चीनदेखील माघार घेण्यास तयार नाहीये. या टॅरिफ वॉरमध्ये अमेरिकी उत्पादनांवर टॅरिफ वाढत आहे. अमेरिकीच्या उत्पादनावर चीनचा 84 टक्के टॅरिफ लादण्यात आल्याचा परिणाम दिसतोय. याचमुळं सोन्याच्या दरात तेजी अशीच राहण्याची शक्यता आहे.