Marathi News> भारत
Advertisement

पुन्हा घडलं सैराट! बहिणीचं प्रेमप्रकरण सहन न झाल्याने गोळी घालून केली हत्या

पुन्हा एकदा खोट्या इज्जतीसाठी हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पुन्हा घडलं सैराट! बहिणीचं प्रेमप्रकरण सहन न झाल्याने गोळी घालून केली हत्या

मेरठ :  उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा खोट्या इज्जतीसाठी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या अल्पवयीन बहिनीची गोळी घालून हत्या केली. आरोपीच्या बहिणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबध होते. ते काही दिवसांपूर्वीच घरातून पळून गेले होते.

नक्की काय आहे प्रकऱण?

रसधनाच्या छुर गावातील ही घटना आहे. येथे राहणारी 16 वर्षीय अंजलीचे जानी परिसरात राहणाऱ्या गौरव नामक तरुणासोबत प्रेमसंबध होते. 13 जून रोजी गौरव आणि अंजली घरातून पळून गेले. 14 जून रोजी त्यांना मथुरा येथून ताब्यात घेण्यात आले. अंजलीच्या पळून जाण्याने घरच्यांची बदनामी झाली असे तिच्या कुटूंबियांचे म्हणणे होते. या घटनेमुळे तिचा मोठा भाऊ संतप्त होता. 

गोळी मारून केली हत्या

अंजली घरी परतल्यानंतर तिचा मोठा भाऊ शेखरने जीवे मारण्याची धमकी दिली. कुटूंबियांनी खुप समजावले परंतु त्याचा संताप नियंत्रणात येत नव्हता. शुक्रवारी अंजली झोपल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर पिस्तुलीने गोळी मारून हत्या केली. या घटनेत अंजली जागीच मृत पावली.

इतर कुटूंबिय तेथे पोहचण्याच्या आत शेखरने तेथून पोबारा केला. घटनेचा पुढील तपास पोलिस तपास करीत आहेत.

Read More