Sonam Raghuvanshi : गेल्या काही दिवसांपासून देशात मेघालयात हनिमूनासाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं प्रकरण गाजतेय. राजा याची एका डोंगरावर कुंजलेल्या अवस्थेत बॉडी सापडली. पण पत्नी सोनम गायब होती. अखेर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं असून राज याच्या हत्येमागील इतर चार आरोपींनाही गजाआड केलं आहे. पोलीस तपासात दररोज या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. राजा रघुवंशीला मारण्यासाठी मारेकरी डोंगरावर चढताना थकले होते. त्यानंतर सोनम चिडली होती. राजला मारण्यासाठी तिने मारेकरांना पैसे वाढून दिले.
पोलीस विश्वासनीय सूत्रानुसार लग्नाच्या चार दिवसांनी सोनम तिच्या सासरच्या घरातून माहेरी गेली होती. तिथे तिने राज कुशवाहासोबत राजा रघुवंशीची हत्या करण्याचा कट रचल्याच समजतं. अचानक तिने शिलाँगला जाण्यासाठी तिकीट बूक केलं. त्यानंतर हनिमूनला जाण्यासाठी राजला मनवलं. तरदुसरीकडे तिने राज कुशवाहासोबत 14 लाखांवर तीन कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली. राजची हत्या केल्यानंतर ते सुटल्यास त्यांना तिच्या भावाच्या कंपनीत नोकरी देईल असही आमिष दिलं.
सोनमने 23 मे रोजी शिलाँगमध्ये राजाला मारण्याचा प्लॅन बनवला होता. त्या दिवशी तिने शेवटचा फोन तिच्या सासूशी बोलली होती. ती तिच्या सासूशी बोलत असताना पायऱ्या चढत होती. त्यासोबत तीन मारेकरीही पायऱ्या चढत होते. पायऱ्या चढताना मारेकरी थकले. अशा परिस्थितीत ते मारण्यास नकार देऊ लागले. नंतर, तिन्ही मारेकरी राजा रघुवंशीसोबत चालायला लागले. थकल्याचे नाटक करून सोनम त्यांच्या मागे चालत होती.
मारेकरी हत्येला उशीर करत होते. सोनमला हे सहन झाले नाही. यानंतर तिने मागून ओरडून त्याला मारण्यासाठी ओरडले. यावर आरोपी म्हणाले की, आम्हाला डोंगर चढून कंटाळा आला आहे. सोनमला त्यांच्यावर खूप राग आला. तिला राजला संपवायचं होतं. त्यामुळे सोनमने त्यांना अजून पैसे देऊ केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारराजा रघुवंशीला मारण्यासाठी सोनमने मारेकऱ्यांशी 14 लाख रुपयांची सुपारी दिली होती. जेव्हा ते नकार देऊ लागले तेव्हा सोनम म्हणाली की त्यांना त्याला मारावे लागेल. मी तुम्हाला 20 लाख रुपये देईन. मग तिने राजाच्या पर्समधून 15 रुपये काढले आणि मारेकऱ्यांना दिले की त्यांना त्याला मारावे लागेल. आरोपींनी पोलिसांसमोर या सर्व गोष्टी कबूल केल्या आहेत.