Marathi News> भारत
Advertisement

युद्धजन्य परिस्थिती, तेलटंचाई आणि महागाईच्या काळात MEIL भारतीय कंपनीची उल्लेखनीय कामगिरी

जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची ऑईल रिग ओएनजीसीकडे सुपुर्द

युद्धजन्य परिस्थिती, तेलटंचाई आणि महागाईच्या काळात MEIL भारतीय कंपनीची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई : गोदावरी जिल्ह्याच्या पश्चिम आणि पुर्व  भागातील ओएनजीसी (ONGC) मार्फत तेलासाठी विहीरी खणल्या जात आहेत. सध्याच्या काळात महागलेल्या इंधनदराच्या काळात तर भारतीय भूमीत तेल मिळवणं आणि त्याचं उत्पादन वाढवणं या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. 

अशा परिस्थितीत मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ने स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत 'ऑईल ड्रिलिंग रिग' आंध्रप्रदेशातील भीमावरम इथं नुकतीच ओएनजीसीकडे सुपुर्द केली.  या नवीन ड्रिलिंग रिग मूळे ऑइल आणि गॅसच्या उत्पादनाचा वेग तर वाढतोच शिवाय अधिक  सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चात देखिल बचत होते. 

fallbacks

महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असल्याने वैयक्तिक सुरक्षिततेला प्राधान्य मिळतं. जगात सर्वात मोठ्या क्षमतेची म्हणजेच 2000 एचपी क्षमतेची ही ड्रिलीग रिंग जमीनीवरच्या तेल विहीरीसाठी उत्खनन करणार आहे. आता पर्यत MEIL ने 10 रीगचा पुरवठा ओएनजीसीला केला आहे. त्यातील तीन कार्यान्वीत सुध्दा झाल्यात तर इतर  7 रीग पुढच्या 4 ते 5 आठवड्यात ओएनजीसीच्या वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रात कार्यरत होतील. 

fallbacks

विविध क्षमतेच्या एकूण 47 रीग्ज MEIL ओएनजीसीला पुरवणार आहे. कोव्हीड काळात देखील या रीग्जचा पुरवठा शक्य तेवढ्या लवकर करण्यात आला. के. सत्य नारायण, MEIL चे तांत्रिक विभागाचे प्रमुख यांनी सांगतीले की मेक इन इंडिया" आणि "आत्मनिर्भर भारत" उपक्रमांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह  उत्तम कार्यक्षमतेच्या तेल ड्रिलिंग रिग्स तयार करणारी MEIL ही भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे. 

fallbacks

ऊर्जेच्या किमती जसजशा वाढत जातात, तसतस आपल्या सर्वाना कळतय की प्रगत रिग भारतीय ऊर्जा क्षेत्रासाठी कीती  महत्त्वपूर्ण असतात “

MEIL ने ओएनजीसीला पुरवलेल्या जगातील सर्वोच्च क्षमतेच्या रिगची वैशिष्ठे 
- C4R1 ही 2,000-HP क्षमतेची प्रगत रिग - MEIL चे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत उत्पादन
- स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित आणि तयार केली गेली आहे
- ही रिग स्वयंचलित हायड्रॉलिक प्रणालीवर काम करते 
- एकच अभियंता संपूर्ण रिग ऑपरेट करू शकतो
- देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो
- रिग खूप वेगाने विहिरी ड्रिल करते
- जमीनीत  6,000 मीटर(6 किमी)  खालपर्यत खणू शकते
- रिगचे भाग वेगळे करून दुसरीकडे परत रिग उभारते येते
- उच्च दाब आणि उच्च तापमानात रिग ड्रिल करते 
- संपूर्ण रिग अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (API) मानकांशी सुसंगत
 -उच्च सुरक्षा वैशिष्ट्य असणारी रिग

Read More