Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना निषेध कऱण्याचं आवाहन केलं आहे. उद्या जेव्हा तुम्ही नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा हातावर काळी पट्टी बांधून जावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. याद्वारे आपण परदेशी शक्तींना भारताची शांतता आणि एकता कमकुवत करू देणार नाही असा संदेश पाठवू. या हल्ल्यामुळे दुष्टांना आपल्या काश्मिरी बांधवांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. मी सर्व भारतीयांना शत्रूच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन करतो असं ते म्हणाले आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते म्हणत आहेत की, "मी असदुद्दीन ओवेसी सर्वांना आवाहन करत आहे की, आपल्या सर्वांना काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी 27 हून अधिक नागरिकांचा जीव घेतला आहे. अनेकजण जखमी असून, आयुष्याशी झुंज देत आहेत. माझं सर्वांना आवाहन आहे की, या दहशत आणि राक्षसी अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा आपल्या हातावर काळी पट्टी बांधून जा".
पहलगाम के आतंकी हमले के सिलसिले में मेरी अपील: कल जब आप नमाज़-ए-जुम्मा पढ़ने जायेंगे तो आपने बांह पर काली पट्टी बांधकर जाएँ। इस से हम यह पैग़ाम भेजेंगे की हम भारतीय विदेशी ताक़तों को भारत के अमन और इत्तेहाद को को कमजोर करने नहीं देंगे। इस हमले की वजह से शर-परस्तों को हमारे… pic.twitter.com/r6uYdzQiOf
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 24, 2025
पुढे ते म्हणाले आहेत की, "जेणेकरुन दहशतवाद्यांना आम्ही त्यांच्या या राक्षसी कृत्याचा निषेध करतो आणि कधीही इस्लामच्या नावे सामान्यांच्या हत्या करण्याची परवानगी देऊ शकत नाही असा संदेश देता येईल. बाहेरच्या शक्ती येऊन आपल्या देशातील नागरिकांचा जीव घेतली हे सहन करु शकत नाही. त्यामुळे उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करताना काळी पट्टी बांधा".