Mimi Chakraborty Complain About Hair In Food Of Flight : तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC MP) खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच मिनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिमी यांनी त्यांना आलेला विमानातील प्रवासाविषयी सांगितले आहे. इतकंच काय तर विमान कंपनीला मेल करूनही त्यावर कोणतेही उत्तर आले नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी तक्रार केली आहे.
मिमी चक्रवर्ती यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिमी (Mimi) यांनी विमानात मिळणाऱ्या जेवणाविषयी सविस्तर सांगत तक्रार केली आहे. मिमी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या की प्रिय अमीरात, मला वाटतं की तुम्ही खूप मोठे आणि प्रसिद्ध झालेला आहात. आता तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अजिबात काळजी वाटत नाही, त्यांची थोडीही चिंता नाही. माझ्या मते प्रवाशाच्या जेवणामध्ये केस सापडणं ही गोष्ट खूप वाईट आणि त्यासोबतच संतापजनक आहे. या संबंधीत तक्रार करण्यासाठी मी तुमच्या टीमला मेल देखील केला आहे. त्या मेलवर उत्तर देत कोणी माफी मागितली नाही तर त्यावर उत्तर देण्याचं कष्ट देखील केले नाही, याचा अर्थ तुम्हाला त्याची गरज वाटली नसेल. मी खात असलेल्या क्रॅमब्रूले आणि क्रॉसो खात असताना मला त्यात केस मिळाला आहे. जर आता तुम्हाला याची थोडी काळजी वाटत असेल तर मी तुम्हाला मेल केला आहे तो नक्की चेक करा. त्यात सगळ्या डीटेल्स देण्यात आल्या आहेत.
Dear @emirates i believe u hav grown 2 big to care less abut ppl traveling wit u.Finding hair in meal is not a cool thing to do i believe.
— Mimi chakraborty (@mimichakraborty) February 21, 2023
Maild u nd ur team but u didn’t find it necessary to reply or apologise @EmiratesSupport
That thing came out frm my croissant i was chewing pic.twitter.com/5di1xWQmBP
विमान कंपनीने मिमी चक्रवर्ती यांच्या या ईमेलला उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, "नमस्कार. मला तुम्हाला आलेल्या अनुभवाविषयी ऐकून खूप वाईट वाटले. कृपया हा ऑनलाइन फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करा. तुमचा फीडबॅक नक्कीच द्या. आमची कस्टमर रिलेशनची टीम तुमच्या अडचणीत सहाय्य करेल. धन्यावाद!"
हेही वाचा : Prajakta Mali चं फॅनपेज हॅक? चाहत्यांना या शब्दांत केली कळकळीची विनंती...
Dear @emirates i believe u hav grown 2 big to care less abut ppl traveling wit u.Finding hair in meal is not a cool thing to do i believe.
— Mimi chakraborty (@mimichakraborty) February 21, 2023
Maild u nd ur team but u didn’t find it necessary to reply or apologise @EmiratesSupport
That thing came out frm my croissant i was chewing pic.twitter.com/5di1xWQmBP
दरम्यान, काही नेटकऱ्यांनी मिमी यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला ही उगाचची नाटकं आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला, तुमच्या घरी जेवणात जर केस सापडला असता तर तुम्ही असं केलं असतं का?