Marathi News> भारत
Advertisement

Covid-19 : कोरोना पुन्हा येतोय! केंद्र सरकार अलर्ट मोडवर, परदेशातून कोणी येत असेल तर...

Corona virus: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health and Family Welfare) परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलान्स जाहीर केल्या आहेत.

Covid-19 : कोरोना पुन्हा येतोय! केंद्र सरकार अलर्ट मोडवर, परदेशातून कोणी येत असेल तर...

Coronavirus Alert in India : कोरोनाने (Covid-19) पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून शेजारी राष्ट्र असलेल्या चीनमध्ये (China Covid Outbreak) हैदोस घालायला सुरूवात केली आहे. चीनमध्ये लाट येणार असून यामध्ये 80 कोटी लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाचे नवीन व्हेरियंट (Corona Varient) समोर येत असून ते अत्यंत धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता सर्वांचं टेन्शन वाढलंय. (Ministry of Health and Family Welfare issues guidelines for international arrivals in India amid current Covid19 situation marathi news)

अशातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health and Family Welfare) परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलान्स जाहीर केल्या आहेत. या संदर्भात लेखी निर्देश (guidelines for international arrivals in India) जारी करण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱ्यांसाठी एअर सुविधा फॉर्म पुन्हा भरणं अनिवार्य असेल. 72 तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणी (RTPCR) करावी लागेल. त्यानंतर त्याची माहिती फॉर्ममध्ये भरायची आहे.

24 डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय फ्लाईटमधून (International Flight) येणाऱ्या प्रवाश्याला रँडमली कोविड चाचणी द्यावी लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा - Covid-19 : यूपीत टेस्टिंग, कर्नाटकात स्क्रिनिंग, महाराष्ट्रात... पाहा कोणत्या राज्यात काय सुरु आहे

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व राज्य आपापल्या पद्धतीने उपाययोजना करत असल्याचं पहायला मिळतंय. राज्य सरकार टास्क फोर्स (Task Force) स्थापन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

Read More