Marathi News> भारत
Advertisement

Video : पापा की परी पडली भारी! बॉयफ्रेंड आर्थिक संकटात, म्हणून तिने वडिलांची तिजोरीच केली लंपास

Viral Video : बॉयफ्रेंड आर्थिक संकटात आहे म्हणून प्रेयसीने वडिलांच्या तिजोरीवर डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली. 

Video : पापा की परी पडली भारी! बॉयफ्रेंड आर्थिक संकटात, म्हणून तिने वडिलांची तिजोरीच केली लंपास

Viral Video : एका धक्कादायक चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात एक 16 वर्षांची मुलगी एका मुलासोबत चोरी करताना दिसतं आहे. या चोरीमुळे पालकांसह पोलीसही चक्रावले आहेत. प्रेम हे आंधळ असतं असं म्हणतात. आणि प्रेमाच्या व्यक्तीसाठी आपण जीव द्यायला पण तयार असतो, अशी प्रेमात आपण बोलतो. मग काय बॉयफ्रेंड अडचणीत आहे, हे समजल्यावर त्या तरुणीने जे केलं ते धक्कादायक आहे. चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, ही घटना वाचून तुम्हीला धक्का बसेल. ही घटना, अहमदाबादमधील शेला भागातील आहे. 

असा घटना आली समोर...!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 29 सप्टेंबर 2024 रोजी असून अहमदाबादच्या शेला इथल्या एका अपार्टमेंटमध्ये घडली. मुलीच्या वडिलांनी कपाटात लॉकर ठेवले होते. या लॉकरमध्ये 12 बोअरची बंदूक, परवाना, पासपोर्ट, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह 22 काडतुसे होती. ज्यांची एकूण किंमत 1.56 लाखांच्या घरात आहे. ते झालं असं की, वडील त्यांच्या स्कूटरची कागदपत्रे घेण्यासाठी कपाटमधील लॉकर पाहिला गेल. तर काय बघतात लॉकर गायब दिसलं. घरात कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज पाहून त्यांना धक्काच बसला. कारण त्याची स्वतःची मुलगी आणि एक तरुण लॉकर घेऊन जाताना त्यांना दिसले.

व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण ऋतुराज सिंह चावडा असून तो कांकरिया इथलील बोर्डी मिल परिसरात राहणारा आहे. मात्र, मुलीने चोरीचा इन्कार देत ती म्हणाली की तिने फक्त दुसरा बॉक्स उचलला होता, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू होत्या. लॉकरमध्ये काडतुसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याने वडिलांनी बापळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ऋतुराज सिंगला अटक करून चौकशी सुरू केली.

चौकशीत अशी माहिती मिळाली की, तरुणी आणि ऋतुराज यांची दोन वर्षांपूर्वी नवरात्रीदरम्यान भेट झाली होती. नंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. ऋतुराज हा आर्थिक संकटाशी झुंजत होता, त्यामुळे त्याने या मुलीला लॉकर चोरण्यासाठी राजी केलं. चोरी केल्यानंतर दोघांनी लॉकरमध्ये सापडलेल्या वस्तू वसना रिव्हरफ्रंटजवळील झुडपात फेकून दिल्या. बापळ पोलीस म्हणाले की, अल्पवयीन मुलगी आणि ऋतुराज सिंह यांच्यावर काय कायदेशीर पावले उचलता येतील. अद्याप तपास सुरू असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. 

Read More