Miraj 2000 fighter jet: भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या दर्शनाने पाकिस्तानची अक्षरक्षा बोबडी वळलीय. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत अनेक दहशतवाद्यांना खात्मा केलाय. एअर स्ट्राईक करणारं आपलं तेज मिराज विमान सज्ज झालंय. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची काही खैर नाही.
सर्जिकल स्ट्राईकचा हिरो मिराज 2000 ची पुन्हा चर्चा सुरु झालीय. याच मिराजने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकने तुम्ही पोसलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचा खात्मा केला होता. आता सर्जिकल स्ट्राईकचा भारताचा हिरो पुन्हा एकदा सज्ज झालाय. मिराज भारतीय वायुसेनेसाठी एक शक्तिशाली आणि बहुमुखी लढाऊ विमान आहे.
त्यामुळे पाकिस्तान्यांनो तुमची काही खैर नाही.. पाक आणि दहशतवाद्यांचा निकाल लावण्यासाठी मिराज 2000 पुन्हा एकदा सज्ज झालंय. 1999 कागरिल युद्धातही याच मिराजने पाकिस्तान्यांवर लेझर-गाइडेड बॉम्ब्सचा अचूक मारा केला होता. तर 2019 च्या हवाई हल्ल्यातही दहशतवाद्यांची राख केली होती.
'मिराज 2000' 1985 साली भारतीय वायुदलात सामील झाला. कारगिल युद्ध आणि बालाकोट हवाई हल्ल्यात मोठी कामगिरी बजावली होती. भारतीय वायुसेनेत ‘वज्र’ नावानं ओळखलं जातं. गुप्तचर आणि सामरिक अण्वस्त्र वाहक म्हणून कार्यक्षम असून मिराज 6,300 किलो शस्त्रे वाहू शकते, ज्यात नऊ हार्डपॉइंट्स असतात.
थालेस RDY रडार आहे, जे 100 किमी अंतरावर टार्गेट्स ओळखू शकतं. मिराज 2000 लो-लेव्हल उड्डाणासाठी उत्कृष्ट, शत्रूच्या रडारला चकवण्यास सक्षम आहे. मिराज फायटर जेटने 1999 च्या कारगिल युद्धात लेझर-गाइडेड बॉम्ब्ससह अचूक हल्ले करते. 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यात स्पाइस-2000 बॉम्ब्स टाकून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 50 मिराज विमानं आहे. मिराज भारतीय वायुसेनेसाठी अत्यंत विश्वासार्ह मानले जाते.
हेच भारताचं लढाऊ विमान मिराज आता सज्ज झालंय. त्यामुळे पाकिस्तान्यांचे धाबे दणाणलेत. भारताचं हे फायटर जेट दहशतवाद्यांना पाणी पाजायला सज्जा झालंय. त्यामुळे पाकिस्तानची गाळण उडालीय.