Marathi News> भारत
Advertisement

अंगावर काटा आणणारी घटना : १५ वर्षांच्या मुलीने आधी वडिलांना बेशुद्ध केले, नंतर पेट्रोल टाकून घरात जाळले

 एका १५ वर्षांच्या, नववीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या प्रियकरांसह आपले ४१ वर्षीय वडील जयकुमा यांची हत्या केली. 

अंगावर काटा आणणारी घटना : १५ वर्षांच्या मुलीने आधी  वडिलांना बेशुद्ध केले, नंतर पेट्रोल टाकून घरात जाळले

बंगळुरु : येथील राजा जी नगरमध्ये एका १५ वर्षांच्या, नववीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या प्रियकरांसह आपले ४१ वर्षीय वडील जयकुमा यांची हत्या केली. ज्या पद्धतीने हा खून केला गेला होता, त्यावरून ही हत्या पूर्ण नियोजित होती, असे सिद्ध होत आहे. वडिलांना मुलीचे प्रेमप्रकरण समजल्यानंतर त्यांनी मुलीकडून मोबाईल काढून घेतला होता. त्यामुळे मुलीने प्रियकराच्यामदतीने ही संपूर्ण योजना आखली होती. जयकुमार यांचे कुटुंब मूळचे जोधपूर राजस्थानचे आहे. बंगळुरूमध्ये जयकुमार यांचा दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.

fallbacks

ही घटना शनिवार - रविवारी दरम्यानच्या रात्री घडली. १५ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना दुधातून औषध दिले. दूध प्यायल्यानंतर जयकुमार बेशुद्ध पडलेत. जयकुमार बेहोश झाल्यावर मुलीने चापट मारुन खात्री करुन घेतले. वडील बेशुद्ध असल्याची खातरजमा झाल्यानंतर तिने आपल्या १९ वर्षीय प्रियकर प्रवीणला घरी बोलावले. दोघांनी प्रथम चाकूने हल्ला करुन जयकुमार यांचा श्वास रोखला आणि त्यानंतर त्यांनी सकाळ होण्याची वाट पाहिली.

सकाळी ही अल्पवयीन मुलगी जवळच्या पेट्रोल पंपावर गेली आणि दोन लिटर पेट्रोल घेऊन आली. वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला. या घटनतेत दोन्ही प्रेमी युगलांचे पाय भाजलेत. दरम्यान, वडिलांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकल्यानंतर आग लावली. त्यानंतर आग भडकली आणि आगीचा वणवा पेटला. शेजाऱ्यांना घरात आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.

fallbacks

 आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी बाथरूम गाठले. त्यावेळी त्यांना तिथे जयकुमारचा जळलेला मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. जेव्हा पोलिसांनी याप्रसंगी चौकशी केली त्यावेळी मुलीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांना पलंगावर असलेल्या रक्ताच्या डागांनी संशय आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांनी खूनाची कबुली दिली. प्रवीणला तुरूंगात पाठविण्यात आले आहे, जेथे अल्पवयीन मुलीला त्वरित बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी   घरात अन्य कोणी नव्हते. जयकुमारची पत्नी एका मुलाला एका कार्यक्रमासाठी पुडुचेरी येथे घेऊन गेली. घरात फक्त वडील आणि मुलगी होती. या संधीचा मुलीने फायदा उचला.

fallbacks

या घटनेबाबत धक्कादायक बाब पुढे आली आहे. अल्पवयीन मुलीची ओळख तिच्या प्रियकर प्रवीण यांच्याशी गेल्या पाच वर्षांपासून आहे. दोघे एकाच शाळेत एकत्र शिक्षण घेतले होते. प्रवीण तीन वर्षे सिनिअर होता. पूर्वी दोघे शाळेत भेटायची. मात्र, प्रवीणची शाळा पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी हे दोघे रस्त्यावर किंवा मोठ्या मॉलमध्ये भेटायला लागले. दोघेही तासनतास फोनवर बोलत असत. हे प्रकरण फार काळ लपून राहिले नाही. जयकुमार यांना समजताच त्यानी आपल्या मुलीचा फोनच काढून घेतला. तिला मारहाणहीकेली. प्रवीणबरोबरची मैत्री तोडून टाक, अशी जयकुमार यांनी तिला बजावले होते. बंदी घातल्यानंतर दोघांची मैत्री कायम होती.

fallbacks

वडिलांनी फोन काढून घेतल्यानंतर प्रवीणने मुलीला फोन दिला होता. त्यामुळे त्यांचे फोनवर बोलणे होत असे आणि ते एकमेकांना चोरून भेटायची. मात्र, आपले स्वातंत्र्य संपल्याची भावना झाल्याने मुलगी त्रस्त होती. ती अस्वस्थ झाली. तिला कोणत्याही परिस्थितीत या परिस्थितीतून बाहेर यायचे आहे. यासाठी तिने ठरवले की, आपल्या वडिलांना आपल्या मार्गातून कायमचे बाजुला करायचे आणि तिने हा खूनाचा कट रचला.

Read More