Mobile Phone Snatcher Caught Viral Video : रेल्वे असो किंवा सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना प्रवाशांना आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यावी लागते. मोबाईल फोन, महागडे दागिनी आणि पैशाची बॅग किंवा पर्सवर चोरट्यांचा विशेष डोळा असतो. चोरटे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक करत त्यांचे सामान लंपास करतात. रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर खिडकीतून मोबाईल किंवा पर्स चोरणारी टोळी सक्रिय असते. अशाच एका चोरा प्रवाशाने आयुष्य भराची अद्दल घडवली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Mobile Phone Snatcher Caught social Viral Video now trending today news )
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक तरुण रेल्वे ट्रेनच्या खिडकीला बाहेरून लटकलेला दिसत आहे. धावत्या ट्रेनमधील हा धक्कादायक प्रकार आहे. झालं असं की, रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली असताना या व्यक्तीने खिडकीतून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला होता. तो मोबाईल चोरत असताना प्रवाशांना भनक लागली आणि त्यांनी त्याचा हात धरला.
पण काही वेळातच ट्रेन सुरु झाली आणि प्रवाशांनी त्या चोरट्याला तसंच धरुन ठेवलं. ट्रेन सुसाट पळत होती आणि तो बाहेरच्या बाजूला लटकला होता. तो व्यक्ती त्यांना म्हणत होता मला सोडू नका, नाही तर मी मरेल...
Train Passengers returning from #Barauji/#Begusarai caught the catcher ..the train Mobile snatcher.
— xRAJ (@xhrishiraj) September 15, 2022
same logic pic.twitter.com/aLM3bjXikR
चोरट्याला अद्दल घडावी म्हणून प्रवाशांनी त्याला तब्बल 10 किलोमीटरपर्यंत याच अवस्थेत नेलं. ट्रेन अखेर खगरियाजवल आल्यावर त्यांनी त्या चोरट्याला पोलिसांच्या हवाली केलं. ही धक्कादायक घटना बिहारमधील बेगूसराय इथली असून हा व्हिडीओ जुना आहे. जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.