नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षाच्या मुलीचं तोंडभरून कौतुक केलंय. या चिमुरडीने 'वंदे मातरम' गीत मनमोहक रुपात सादर केलं. यामुळे तिने लोकांचं लक्ष आकर्षित केलं असून इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. या गाण्यामुळे तिचे असंख्य चाहते तयार झाले आहेत.
मा तुझे सलाम तसेच वंदे मातरम सादर करणाऱ्या मुलीचे नाव इस्टर हनामते असून तिने मुख्यमंत्री जोरामथंगा यांचे लक्ष वेधून घेतलंय. तिचा हा व्हिडीओ मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी आपल्या ट्वीटरवरुन शेअर केलाय.
Mesmerizing Esther Hnamte, a 4-years-old kid from Lunglei, Mizoram singing
— Zoramthanga (@ZoramthangaCM) October 30, 2020
Maa Tujhe Salaam; Vande Mataram https://t.co/at40H8j3zv pic.twitter.com/O1Nq2LxACK
मिझोरमच्या लुंगलेईमध्ये राहणारी चार वर्षांची मुलगी मा तुझे सलाम तसेच वंदे मातरम गात असून तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेय, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचे हे ट्वीट आणि मुलीचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटरवरुन शेअर केलाय. मनमोहक आणि कौतुकास्पद असे पंतप्रधानांनी या ट्वीटवर लिहीले. या सादरीकरणासाठी आम्हाला हनामतेवर गर्व असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.