Marathi News> भारत
Advertisement

उलटमोजणी सुरू करा! Monsoon काही दिवसांतच महाराष्ट्राच्या वेशीवर, आता कुठं पोहोचले मोसमी वारे?

Monsoon 2025 : मोसमी वारे...  हे सुखावणार वारे सध्या समाधानकारक वेगानं प्रवास करत असून, त्यांच्या या प्रवासात सध्या कोणता टप्पा आलाय माहितीये?   

उलटमोजणी सुरू करा! Monsoon काही दिवसांतच महाराष्ट्राच्या वेशीवर, आता कुठं पोहोचले मोसमी वारे?

Monsoon 2025 : मे महिना शेवटाच्या टप्प्याकडे जात असतानाच आता या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मान्सूनचे. मोसमी पावसाच्या निर्मिती प्रक्रियेला काही दिवसांपूर्वीच अंदमान आणि निकोबार बेट समुहांवर सुरुवात झाली आणि पाहता पाहता या वाऱ्यांनी अतिशय सकारात्मक वेग धारण करत पुढील टप्प्याच्या रोखानं प्रवास सुरू केला. ज्यामुळं यंदाच्या वर्षी केरळात आणि पर्यायी महाराष्ट्रातही मान्सून तुलनेनं निर्धारित वेळेआधीच पोहोचण्यासाठीची पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसली. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकले असून, अरबी समुद्रासह कोमोरिन क्षेत्र आणि श्रीलंकेतील बहुतेक भाग या वाऱ्यांनी व्यापला आहे. तर तिथं बंगालच्या उपसागरातही वाऱ्यांनी समाधानकारक वेग धारण केला आहे. 13 मे रोजी बंगालच्या उपसागरासह अंदमान- निकोबार इथं दाखल झालेल्या या मान्सूनच्या वाऱ्यांनी 17 मे पर्यंत संपूर्ण अंदमान आणि निकोबार व्यापला आणि श्रीलंकेचा भाग व्यापत या मान्सूननं कन्याकुमारीच्या दक्षिणेकडी सागरी हद्दीत प्रवेश केला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून मालदीवला पूर्णपणे व्यापत दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात पुढील प्रवास सुरू करेल. सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत असल्यानं पुढील काही दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात अर्थात कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. ज्यामुळं आता केरळात मान्सून 27 मे आणि त्यानंतर 1 ते 5 जूनदरम्यान तो महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : भरदिवसा काळेकुट्ट ढग दाटून येणार; मान्सूनपूर्व पावसाचा मारा 'या' भागांना झोडपणार

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार मान्सूनच्या दीर्घकालिन पूर्वानुमानानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान सामान्यहून अधिक पर्जन्यमान पाहायला मिळेल. प्रत्यक्षात मान्सून सामान्य स्तरावर राहण्यासाठी उत्तर पश्चिम भारतात 'हीट लो' म्हणजेच उष्णतेमुळं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं गरजेचं आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मान्सूनमधील बाष्प शोषलं जातं. मात्र सध्या अशी कोणतीही स्थिती तयार झालेली किंवा होताना दिसत नाही असं हवामानतज्ज्ञ सांगतात.  त्यामुळं एकंदर बदलणारी हवामान प्रणाली मान्सूनचा मुक्काम वाढवणार की आणखी काही.... हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Read More