मुंबई : शेतकऱ्यांसाठी तसेच एकूणच भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. दोन दिवसांच्या विलंबाने मान्सून एक्सप्रेस केरळात दाखल झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) याबाबतची माहिती दिली आहे. यावेळेस 101 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सून अंदमानमध्ये 21 मे ला दाखल झाला. (monsoon Arrival in Kerala information of Indian Meteorological Department)
मान्सून केरळ मध्ये आज दाखल...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 3, 2021
IMD https://t.co/XaoSVCpjUh
हवामान विभागानुसार, जून-सप्टेंबर दरम्यान उत्तर पश्चिम भारतात म्हणजेच पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानमधील काही भागात 108 टक्के पाऊस पडण्याचा अंदाड व्यक्त केला आहे. तर दक्षिण भारतातील केरळ. तामिळनाडू, तेलंगाना, आंधप्रदेश, गोवा आणि ओडिसात 93 ते 107 टक्के मान्सून होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. या भागात इतका पाऊस हा सर्वसाधारण समजला जातो.
कुठे किती पाऊस?
भारतीय हवामान विभागाने या वर्षात संपूर्ण देशात सरासरी पाऊसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानुसार, देशात Long Period Average नुसार 96 ते 101 टक्के मान्सून बरसणार आहे. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरल्यास भारतातील हा सलग तिसरा सर्वोत्तम मान्सून ठरेल. तसेच जुलै महिन्यात मान्सून किती बरसणार, याबाबतचा अंदाज भारतीय हवामान विभाग जूनमध्ये व्यक्त करणार आहे.
संबंधित बातम्या :
Petrol Price : कच्च्या तेलाची किंमत 72 डॉलरवर, पेट्रोल - डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम होणार?