Marathi News> भारत
Advertisement

Weather Update: अतिमुसळधार पावसानं किनारपट्टी भागाला झोडपलं; IMD कडून Yellow Alert

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा पाऊस पाहता जनजीवनही विस्कळीत झालं आहे. 

Weather Update: अतिमुसळधार पावसानं किनारपट्टी भागाला झोडपलं; IMD कडून Yellow Alert

मुंबई : अंदमानातून सुरु झालेला मान्सूनचा प्रवास केरळमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो असं एकंदर चित्र असतं. यंदा ठरलेल्या तारखेच्या आधीच मान्सून अंदमानात आला आणि त्याच्या प्रवासाला वेगही मिळाला. केरळमध्येही पाऊस लवकरच हजेरी लावत महाराष्ट्रात दाखल होण्यास पूरक परिस्थिती तयार झाली. पण मान्सूनची (Monsoon) सुरुवात होण्यापूर्वीच गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये जोरदार पाऊस सुरु असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. (Weather Update)

येणारा आठवडाभर तिथं पावसाची अशीच परिस्थिती असेल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. शनिवार आणि रविवारी केरळमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

10 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टही सांगण्यात आला आहे. इडुक्की जिल्हा प्रशासनाने पाण्याचा प्रवाह नियंत्रीत ठेवण्यासाठी कल्लारकुट्टी आणि पंबला येथी बंधाऱ्यांचे दरवाजे खुले केले आहेत. 

IMD  भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, मलप्पुरम आणि कोझीकोड इथं यलो अलर्ट, तर वायनाडमध्ये 22 मे रोजी यलो अलर्ट दिला आहे. 

केव्हा दिला जातो यलो अलर्ट? 
रेड अलर्ट 24 तासांमध्ये 20 सेंटीमीटरहून जास्तीच्या पावसाचा इशारा देतो. तर, ऑरेंज अलर्ट 6 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर इतक्या पावसाची शक्यता वर्तवतो. यलो अलर्टमध्ये 6 ते 11 सेंटीमीटर इतक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. 

मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा 
आयएमडीच्या माहितीनुसार केरळच्या उत्तर किनारपट्टीसोबतच त्यापलीकडील परिसरामध्ये प्रतीतास 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी 60 किमी इतकाही असू शकतो. याच धर्तीवर मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Read More