Marathi News> भारत
Advertisement

ना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीच्या कारवर आहे देशातली सर्वात महागडी नंबर प्लेट

Most Expensive Car Number Plate: जेव्हाजेव्हा एखाद्या महागड्या गोष्टीचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा काही नावं समोर येतात. अंबानी आणि अदानी ही त्यातलीच काही नावं....   

ना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीच्या कारवर आहे देशातली सर्वात महागडी नंबर प्लेट

Most Expensive Car Number Plate: देशातील श्रीमंतांच्या यादीत सातत्यानं अग्रस्थानी असणाऱ्या अंबानी आणि अदानी यांच्या व्यवसाय व्याप्तीविषयी बोलावं तितकं कमीच. जगाच्या पाठीवरील जवळपास सर्व सुखसोई असणाऱ्या आणि महागड्या वस्तू अगदी सहजपणे सोबत बाळगणाऱ्या याच अंबानी आणि अदानी यांना कधी कोणी शह देईल याचा विचार तुम्ही केला आहे का? 

जाणून आश्चर्य वाटेल, पण असं खरंच घडलं आहे. श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नावांचा समावेश असला तरीही एका यादीत मात्र त्यांच्यावर एका व्यक्तीनं मात केली आहे. यी यादी आहे सर्वात महागड्या कार नंबर प्लेटची. कोणाकडे आहे ही महागडी नंबर प्लेट माहितीये? 

हेसुद्धा वाचा : मुंबई रेसकोर्सचे मालक कोण? आज 1 BHK ही येणार नाही इतक्या किंमतीत झालेला 225 एकरांचा सौदा

 

गोष्ट महागड्या नंबर प्लेटची... 

भारतात आशिष पटेल नावाच्या व्यक्तीकडे असणारी कार नंबर प्लेट ही सर्वात महाग असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या Toyota Fortuner कारवर ही नंबर प्लेट कारचा नंबर आहे, 007. सूत्रांच्या माहितीनुसार या नंबर प्लेटची किंमत 34 लाख रुपये असून, हा क्रमांक जेम्स बॉन्डच्या चित्रपटांपासून प्रेरणा घेणारा असल्यामुळं तो अतिशय खास असल्याचं म्हटलं जातं. इतकंच नव्हे, तर पटेल यांनी 39.5 लाख रुपये किमतीला त्यांची नवी एसयुव्ही कार खरेदी केली असून, त्यावरील नंबर प्लेटसाठी त्यांनी जवळपास कारइतकीच किंमत अर्थात 34 लाख रुपये मोजले. 

अशी चर्चा आहे की पटेल यांच्याकडे असणारी नंबर प्लेट ही जेम्स बॉण्डच्या चित्रपटांपासून प्रेरित असून, त्यामुळंच हा नंबर आणखी खास ठरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कारचं वेगळेपण जपण्यासाठी देशात अशी कैक माणसं आहेत जे गडगंज रक्कम मोजायला आजही तयार आहेत. पटेलही त्याच यादीतले... असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

 

Read More