Marathi News> भारत
Advertisement

'माझ्याकडे 18 एकर जमीन, पण मुलगी मिळेना,' बाबाच्या दरबारात व्यथा मांडणाऱ्या तरुणासोबत घडलं असं काही; अख्खं गाव हादरलं

NewlyWed Wife Murdered Man For 18 Acre Land:  अनिरुद्धचार्य महाराज यांच्या दरबारात समस्या मांडणाऱ्या एका व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

'माझ्याकडे 18 एकर जमीन, पण मुलगी मिळेना,' बाबाच्या दरबारात व्यथा मांडणाऱ्या तरुणासोबत घडलं असं काही; अख्खं गाव हादरलं

NewlyWed Wife Murdered Man For 18 Acre Land: लग्न ठरत नव्हते म्हणून मध्य प्रदेशातील जबलपूरचा तरूण अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या दरबारात गेला. तिथे त्याने 18 एकर जमीन असूनही लग्न होत नाही, अशी समस्या मांडली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीचे लग्नही ठरले. मात्र जिच्यासोबत लग्न ठरले तिने त्याच्यासोबत असं काही केलं की परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इंद्रकुमार तिवारी हे शेतकरी आणि पार्टटाइम शिक्षक म्हणून शिकवत होते. मागील महिन्यातच एका सत्संग कार्यक्रमात गेल्यानंतर त्याने त्याचे दुःख सांगितले. वय होऊन गेल्यानंतरही त्याचे लग्न ठरत नव्हते. शेतकरी असल्याने कोणीही लग्नासाठी तयार होत नसल्याचे त्याने म्हटलं होतं. त्या कार्यक्रमातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. अनिरुद्धाचार्य यांना इंद्रकुमार यांनी 18 एकर संपत्ती असल्याचेही सांगितले होते. तेव्हा अनिरुद्धाचार्य यांनी गंमतीने उत्तर दिले होते की, इतकी संपत्ती आहे तर तुम्ही साधु का होत नाही. तुमची संपत्ती गरिबांमध्ये दान करा. 

इंद्रकुमार तिवारी यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर 6 जून रोजी त्यांचा मृतदेह आढळला. उत्तर प्रदेश कुशीनगर येथे त्याचा मृतदेह आढळला. शरीरात चाकू घुसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. कुशीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासानुसार, साहिबा बानो उर्फ खुशी तिवारी हिने इंद्रकुमारसोबत लग्न केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने इंद्रकुमार यांना शोधले आणि त्यांच्याशी लग्न केले. त्यांच्याशी ओळख वाढवण्याआधी तिने त्यांना खोटे आधारकार्डदेखील दाखवले. 

खुशी तिवारीने इंद्रकुमार यांना शोधून त्यांना लग्नासाठी मनवले. दोघांनी लग्नदेखील केले. मात्र लग्न हा एक मोठा प्लान होता. खुशीने तिच्या साथीदारासह हा प्लान रचला होता. तिने दोन साथीदारांसह इंद्रकुमार तिवारीचा लग्नाच्या दोन तासांनंतरच खून केला. तसंच, त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रकुमार यांनी त्याच्या कुटुंबीयांना आधीच ते खुशीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितले होते. इंद्रकुमार यांच्यासोबत लग्न केल्यानंतर खुशीने तिच्या दोन साथीदारांसह त्यांची हत्या केली. इतकंच नव्हे तर, इंद्रकुमार यांनी आणलेली रोख रक्कम आणि कॅशदेखील घेऊन खुशी पळून गेली होती. 

साहिबा उर्फ खुशी हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिने खोटे आधारकार्डदेखील बनवले होते. दरम्यान, साहिबाने इंद्रकुमारसोबत लग्नाचे खोटे फोटोदेखील काढले होते. त्याच्या मृत्यूनंतर विधवा म्हणून त्याची 18 एकर जमिन हिसकवण्याचा तिचा प्लान होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

Read More