आपल्या विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे पुन्हा त्यांच्या एका वक्तव्याने चर्चेत आले आहेत. दुबे यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं विधान केलं आहे. मोदींना नव्हे तर भाजपला मोदींची गरज असल्याचं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेले भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या एका ताज्या वक्तव्याने पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी दुबे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप संदर्भातच विधान केलं आहे. मोदींना नव्हे तर भाजपला मोदींची गरज असल्याचं थेट विधान निशिकांत दुबे यांनी केलं होतं. जर मोदी चेहरा नसतील तर भाजप 150 जागाही जिंकू शकणार नाही असं थेट विधान निशिकांत दुबे यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपची ही सत्ता मोदींमुळेच असल्याचं दुबे यांनी आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केलं आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काहीच दिवसांपूर्वी 75 व्या वर्षी निवृत्त होण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याचा आधार घेत खासदार निशिकांत दुबे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर दुबेंनी हे उत्तर दिलं आहे.
जवळपास एक वर्षांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संघा संदर्भातील एका वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो, क्षमता कमी असताना संघाची गरज होती असं ते म्हणाले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं होतं. आणि त्यावरूनही अनेक उलटसुलट चर्चा झाल्या होत्या..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे.. संघाला भाजपचा थिंकटँक म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे संघाचे अनेक नियम अथवा भूमिका भाजप राबवत असतं..भाजपमध्ये 75 वर्षांनंतर निवृत्त व्हावं हा अलिखित नियम आहे.. यामुळेच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या दिग्गजांना निवृत्त व्हावं लागलं होतं. त्याच अनुशंगाने निशिकांत दुबे यांच्या मोदींसदर्भातील वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.