Marathi News> भारत
Advertisement

औरंगजेबच्या वंशजाने डायरेक्ट DNA रिपोर्टच कोर्टात सादर केला; कारण काय तर....

ताजमहल, बाबरी आणि लाल किल्ल्याचे मालक असल्याचा दावा मुघल वंशजाने केला आहे. औरंगजेबच्या वंशजने डायरेक्ट DNA रिपोर्टच कोर्टात सादर केला आहे. 

औरंगजेबच्या वंशजाने डायरेक्ट DNA रिपोर्टच कोर्टात सादर केला; कारण काय तर....

Prince Yakub Habeebuddin Tucy :  वक्फ विधेयकानरुन संपूर्ण देशात आणि औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. औरंगजेबाच्या कबरीचं सरंक्षण करण्याच्या मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांच्या नव्या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे. ताजमहल, बाबरी आणि लाल किल्ल्याचे मालक आम्हीच असा दावा  प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी केला आहे. मुघल वंशज असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रिन्स याकूब हबीबुद्दीन DNA रिपोर्टच कोर्टात सादर केला. 

मुघल साम्राज्याच्या सम्राटांनी जवळपास 350  वर्षे भारतावर राज्य केले. बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल सम्राट होता. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून ब्रिटिशांनी त्याला अटक केली होती. त्याच्यासोबतच मुघल साम्राज्याचा अंत झाला. असे असले तरी स्वतःला मुघलांचे वंशज असल्याचा दावा करणारे लोक वेळोवेळी दिसून येत राहतात. त्यापैकी एक म्हणजे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी. 

मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा पणतू असल्याचा दावा प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी करतो. प्रिन्स तुसी यांचा दावा आहे की उझबेकिस्तानसह अनेक देशांनी त्यांना मुघल वंशज म्हणून स्वीकारले आहे. डीएनए चाचण्यांमध्येही त्यांच्या दाव्याची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी  मुघल सम्राटांसारखेच पोशाख घालून फिरतो. यामुळे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी  नेहमीच चर्चेत असतो.

प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी याने कोर्टात DNA चे पुरावे सादर करत आपण मुघलांचे वंशज असल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर मुघलांनी बांधलेला ताजमहाल, दिल्लीतील लाल किल्ला आणि अयोध्येतील बाबरी मस्जिद जमीन आमच्याच मालकीचा असल्याचा दावा केला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच औरंगजेबाच्या कबरीचं सरंक्षण करण्याच्या मागणीसाठी प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून साकडं घातलंय. पत्रातून त्यांनी कबरीच्या संरक्षणाची मागणी केलीय... प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी हे पत्र भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्र राज्यपाल, आणि स्थानिक पोलीस यंत्रणासह  महत्वाच्या लोकांना पाठवलंय. प्रिन्स याकूब हबीबुद्दीन हे मुघल कुटुंबांचे उत्तरधिकारी असल्याचे त्यांनी या पत्रात म्हंटले आहे. 

हे देखील वाचा.... औंरगजेबची कबर ज्या जागेवर आहे ती जागा कुणाच्या मालकीची आहे? नाव जाणून बसेल धक्का

Read More