Marathi News> भारत
Advertisement

Reliance Retail Store : घ्या... हेच कमी होतं; मुकेश अंबानींची कंपनी आता विकणार मिठाई...

sweets reliances : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी मिठाई तुम्हाला चॉकलेटसारख्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणार आहेत.

Reliance Retail Store : घ्या... हेच कमी होतं; मुकेश अंबानींची कंपनी आता विकणार मिठाई...

fallbacks

Mukesh Ambani :  रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पहिले विला त्यानंतर हवेली घेतल्यानंतर आता नवीन क्षेत्रात एन्ट्री केली आहे. दिवाळीच्या  (Diwali 2022)  मुहूर्तावर मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता नवीन क्षेत्रावर कब्जा करणार आहेत. जियोनंतर (jio) आता मुकेश अंबानी यांनी मिठाई (sweets) मार्केटमध्ये पाया पसरविण्यास सुरु केली आहे. 

मिठाई मार्केटवर कब्जा

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीडने किरकोळ व्यवसाय युनिटने देशभरातील 50 हून अधिक प्रसिद्ध मिठाई विक्रेत्यांशी करार केला आहे.  आता एका छताखाली देशभरातील प्रसिद्ध मिठाई ग्राहकांना मिळणार आहे. (mukesh ambani sweets reliances shops nmp )


मिठाई विकण्यासाठी भन्नाट आयडिया 

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी मिठाई तुम्हाला चॉकलेटसारख्या (Chocolate) छोट्या पॅकेटमध्ये मिळणार आहेत. या मिठाईंमध्ये केळवा 'तिळ बेसन लाडू', घासीटारामचा 'मुंबई हलवा', प्रभुजीचा 'दरबेश लाडू आणि मेथीचे लाडू', दूध स्वीट्स भंडारचा 'मालपुआ', 'म्हैसूर पाक' आणि रेड स्वीट्सचा 'धारवाड पेडा' यांचा समावेश आहे. पारंपारिक मिठाई एका विशिष्ट क्षेत्रापूर्ती मर्यादित राहू नये आणि ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे, असं मुकेश अंबानी यांच्या कंपनीचं ध्येय आहे. 

शिवाय ग्राहकांच्या सोयीसाठी आणि मिठाईची विक्री वाढवण्यासाठी स्टोअरमध्ये मिठाई विक्रीसाठी स्वतंत्र युनिट्स सुरु केल्या आहेत. आता मुंबईत (Mumbai) बसून देशभरातील प्रसिद्ध मिठाईची चव चाखता येणार...

Read More